शेखर यांना नेहमी वाटत होतं की कोणाच्या हाताखाली काम करण्यापेक्षा स्वतःचा काहीतरी व्यवसाय असावा. त्यांनी एक वर्षभर विविध व्यवसायांवर संशोधन केलं, बाजारपेठ समजून घेतली आणि शेवटी त्यांनी महाराष्ट्राच्या पारंपरिक खाद्यपदार्थावर विश्वास ठेवत वडापाव व्यवसायाची सुरुवात करण्याचा निर्णय घेतला.
Success Story: कामगार झाला मालक, सुरू केला हॉटेल व्यवसाय, महिन्याला 90000 कमाई, Video
advertisement
शेखर यांनी फ्रँचायजी मॉडेलचा अभ्यास करून त्याआधारे व्यवसाय सुरू केला. आज त्यांचा वडापाव व्यवसाय कर्वेनगरमध्ये चांगलाच लोकप्रिय ठरला आहे. वड्यांसोबत दिला जाणारा ठेचा आणि चिंच-गुळाची चटणी ही ग्राहकांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. वडापावची किंमत 18 रुपये असून, दिवसाला सुमारे 400 ते 500 वडे विकले जात आहेत. यामधून महिन्याकाठी 2 लाखांपेक्षा अधिक कमाई ते करत आहेत.
सुरुवातीला भीती वाटत होती की आपल्याला हे जमेल का? पण मी ठरवलं होतं की मेहनत करून व्यवसाय उभा करायचा. आयटीमधील अनुभवाचा वापर मी व्यवस्थापनात आणि मार्केटिंगमध्ये करत आहे. ग्राहकांचा प्रतिसाद पाहून आत्मविश्वास वाढतो आहे, असं शेखर सांगतात.
धाडस, चिकाटी आणि चांगला दृष्टिकोन असला की कोणतीही कल्पना यशस्वी करता येते. पैशाच्या मागे न धावता, स्वतःच्या आवडीत आणि कल्पनेतूनच मोठं काहीतरी घडवता येतं, अशा भावना शेखर यांनी व्यक्त केल्या.