सिंधुदुर्ग : परिस्थिती काहीही असो, वय कितीही असो, मात्र एखादी गोष्ट ठरवली की, आपण सर्व अडचणींवर मात करून यश प्राप्त करू शकतो. यातच जर कुटुंब आणि घर सांभाळणाऱ्या महिला असतील आणि त्यांनी काहीतरी करण्याचं ठरवलं, तर त्या आपल्या जिद्दीच्या बळावर सगळ्या अडथळ्यांचे डोंगर पार करून यश मिळवतात. अशीच कहाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील पूनम आवटे यांची आहे. त्यांनी अडथळ्यांचे डोंगर पार करत अवगत असलेल्या कलेच्या जोरावर व्यवसाय सुरु केला आहे. यामधून त्यांना लाखोंची कमाई होत आहे.
advertisement
पूनम आवटे यांना लहानपणापासून आर्टची आवड आहे. इंजिनिअरचे शिक्षण घेऊन झाल्यानंतर लग्नानंतर घरातच गृहिणीची काम करत होत्या. त्यामुळे त्यांना नवीन काहीतरी करण्याची इच्छा होती. घरातील काम झाल्यानंतर वेळ जात नसे त्यासाठी त्यांना लहानपणापासून अवगत असलेल्या आर्ट कलेपासून रांगोळी आर्ट, रेडी रांगोळी, मॅट रांगोळी बनवत वेळ घालवत असत सुबक आणि आकर्षक आर्ट त्या फावल्या वेळेत बनवत असत.
रडलो नाही तर लढलो, कलेच्या साथीनं अपंगत्वावर मात, प्रत्येकाला प्रेरणा देईल अशी कहाणी
एक दिवस त्यांना अशी संकल्पना सुचली की आपण या आर्ट ऑनलाईन विक्रीस ठेवून पाहावं. त्यानुसार त्यांनी त्यांनी ऑनलाईन विक्रीस ठेवल्या त्यांच्या या आर्ट ना ग्राहकांची मागणी वाढू लागली. आज त्यांच्या या वस्तूंना परदेशातून जास्त ऑर्डर असल्याच त्या सांगतात.
त्यांच्या वस्तूं आकर्षक असल्याने मागणी वाढली. ऑनलाईन विक्रीतून त्यांनी दोन महिन्यात दोन लाखाचा नफा कमावला आहे. आज त्या प्रत्येक सणानुसार वेगवेगळ्या आकर्षक वस्तू बनवत आहेत. प्रत्येक सणानुसार त्या सणाच्या लागणाऱ्या डीझाईन रांगोळी डिझाईन, मॅट, वूलन अशापासून त्या विविध वस्तू बनवितात आणि त्या वस्तू टिकावू असतात. मनात जिद्ध आणि यश मिळावायचं ठरवलं तर कोणती गोष्ट अवघड नाही. यश पण लांब नाही याच उत्तम उदाहरण पूनम आवटे यांनी दिलं आहे. कलेचं घरातच बसून व्यवसायात रूपांतर करत एक आदर्श समाजा समोर ठेवला आहे.