वेदांता: हिंदुस्तान झिंकमधील हिस्सा विक्रीला मंजुरी
वेदांताच्या संचालक मंडळाने मोठा कॉर्पोरेट निर्णय घेत हिंदुस्तान झिंकमधील 1.59% हिस्सा विक्रीला हिरवा कंदील दिला आहे. कंपनी 6.7 कोटी शेअर्स ‘ऑफर फॉर सेल’ (OFS) मार्गे विक्रीस काढणार असून, यासाठी फ्लोअर प्राइस 685 रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आला आहे. हा OFS 28 आणि 29 जानेवारी रोजी खुला राहणार आहे.
advertisement
हे देखील वाचा- महाराष्ट्राचा डबल फायदा! इचलकरंजी,कोल्हापूर,पुणे,मुंबई, ठाणे होणार एक्स्पोर्ट हब
इन्फोसिस: Cursor सोबत रणनीतिक भागीदारी
इन्फोसिसने जागतिक एंटरप्राइझ ग्राहकांसाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग अधिक वेगवान आणि कार्यक्षम करण्यासाठी Cursor सोबत रणनीतिक सहकार्य जाहीर केले आहे. या भागीदारीत इन्फोसिसची तांत्रिक क्षमता आणि Cursorचे प्रगत टूल्स वापरून सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट अधिक जलद, स्केलेबल आणि प्रभावी करण्यावर भर दिला जाणार आहे.
मॅरिको: तिसऱ्या तिमाहीत दमदार कामगिरी
मॅरिकोने चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत मजबूत निकाल जाहीर केले आहेत. कंपनीचा निव्वळ नफा वार्षिक आधारावर 13.3% वाढून 460 कोटी रुपयांवर पोहोचला, जो मागील वर्षी याच तिमाहीत 406 कोटी रुपये होता. कंपनीचे उत्पन्न 26.6% वाढून 3,537 कोटी रुपये झाले. EBITDA मध्ये 11.1% वाढ होऊन तो 592 कोटी रुपये झाला, मात्र EBITDA मार्जिन 19.1% वरून घसरून 16.7% राहिला.
महिंद्रा लॉजिस्टिक्स: तिमाहीत टर्नअराउंड
महिंद्रा लॉजिस्टिक्ससाठी ही तिमाही सकारात्मक ठरली आहे. कंपनीने 3.25 कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला, तर मागील वर्षी याच तिमाहीत 9.03 कोटी रुपयांचा तोटा झाला होता. कंपनीचे उत्पन्न 19.1% वाढून 1,898 कोटी रुपये झाले. EBITDA 39.5% वाढून 102.79 कोटी रुपये झाला असून, मार्जिन 4.62% वरून 5.42% पर्यंत सुधारले आहे.
LIC: बजाज फायनान्सच्या डिबेंचर्समध्ये गुंतवणूक
LIC ने बजाज फायनान्सच्या 5.12 लाख डिबेंचर्समध्ये सुमारे 5,120 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. या गुंतवणुकीमुळे बजाज फायनान्सला दीर्घकालीन निधी उपलब्ध होणार असून, LIC ची डेट इन्स्ट्रुमेंट्समधील हिस्सेदारीही वाढली आहे.
स्पंदना स्फूर्ती फायनान्शियल: तोटा घटला
स्पंदना स्फूर्ती फायनान्शियलने तिमाहीत तोट्यात लक्षणीय घट नोंदवली आहे. कंपनीचा निव्वळ तोटा 218 कोटी रुपयांवरून 83 कोटी रुपयांपर्यंत कमी झाला. या काळात नेट इंटरेस्ट इनकम 12.7% वाढून 94.5 कोटी रुपये झाली, जी ऑपरेशनल सुधारणेचे संकेत देते.
गोपाल स्नॅक्स: नफ्यात जोरदार उडी
गोपाल स्नॅक्सने तिसऱ्या तिमाहीत भक्कम निकाल दिले आहेत. कंपनीचा निव्वळ नफा 5.3 कोटी रुपयांवरून वाढून 15.4 कोटी रुपये झाला, म्हणजेच सुमारे 191% वाढ झाली आहे. उत्पन्नात 1.6% वाढ होऊन ते 399.6 कोटी रुपये झाले. खर्चात घट झाल्यामुळे EBITDA 88.6% वाढून 29.24 कोटी रुपये झाला. EBITDA मार्जिन 3.93% वरून सुधारून 7.32% झाला. कंपनीच्या बोर्डाने प्रति शेअर 0.35 रुपयांचा दुसरा अंतरिम लाभांश मंजूर केला आहे.
मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस: स्थिर निकाल
मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसचा निव्वळ नफा किरकोळ 0.25% वाढीसह 565.9 कोटी रुपये राहिला. कंपनीचे उत्पन्न 5.9% वाढून 2,111.6 कोटी रुपये झाले आहे.
RVNL: 242 कोटींचा नवा ऑर्डर
रेल विकास निगम लिमिटेड (RVNL) ला साउथ सेंट्रल रेल्वेकडून 242 कोटी रुपयांचा ऑर्डर मिळाला आहे, ज्यामुळे कंपनीच्या ऑर्डर बुकला बळ मिळाले आहे.
रामकृष्णा फोर्जिंग्स: नफ्यावर दबाव
रामकृष्णा फोर्जिंग्सच्या नफ्यावर तिसऱ्या तिमाहीत दबाव दिसून आला. कंपनीचा निव्वळ नफा 35.4% घटून 13.5 कोटी रुपये झाला. मात्र, ऑपरेशनल स्तरावर कामगिरी सुधारली आहे. उत्पन्न 2.3% वाढून 1,098.5 कोटी रुपये झाले, तर EBITDA 29.5% वाढून 163.3 कोटी रुपये झाला. EBITDA मार्जिन 11.8% वरून 14.9% पर्यंत सुधारला आहे.
Disclaimer: वरील माहिती हा केवळ शेअरच्या कामगिरीवर आधारित आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक ही बाजाराच्या जोखमीवर आधारित असते. त्यामुळे गुंतवणूक करण्याआधी सर्टिफाइड इन्व्हेस्टमेंट अॅडव्हायजरचा सल्ला घ्यावा. कोणत्याही आर्थिक नुकसानीसाठी News18 जबाबदार असणार नाही.
