TRENDING:

GST 2.0: नवीन जीएसटी प्रणालीचे स्वागतच, वस्तू स्वस्त होणार, छ. संभाजीनगरमधील व्यापारी नेमकं काय म्हणाले? Video

Last Updated:

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकतीच कर प्रणाली बदलाची घोषणा केली आहे.

advertisement
‎छत्रपती संभाजीनगर : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जीएसटी कर प्रणाली बदलाची घोषणा केली आहे. यामध्ये
advertisement

जीएसटीमधील 12 आणि 28 टक्क्यांचा स्लॅब संपविण्यात आला असून आता सर्व वस्तू या 5 टक्के आणि 18 टक्क्यांच्या स्लॅबमध्ये आणण्यात आल्या आहेत. या नव्या जीएसटी रचनेची घोषणा 3 सप्टेंबर 2025 रोजी करण्यात आली असून येत्या 22 सप्टेंबरपासून नवीन जीएसटी रचना लागू होणार आहे.

‎आलिशान गाड्या, साखरेची पेये, फास्ट फूड महागणार आहेत. काही वस्तूंवरील कर हा 12 टक्क्यांवरून 18 टक्के करण्यात आला आहे. तसेच लक्झरी वस्तूंसाठी 40 टक्के कर लागणार आहे. पान मसाला, गुटखा, दारू इत्यादी वस्तूंवर 40 टक्के जीएसटी लागणार आहे.

advertisement

GST मध्ये झाला बदल, तुम्हाला कसा होईल फायदा? तुमच्या प्रश्नांची A TO Z उत्तरं

वैयक्तिक विमा पॉलिसी आणि आरोग्य विमा पॉलिसी जीएसटीमुक्त करण्यात आल्या आहेत. यामुळे विमा खरेदी आता स्वस्त झाली आहे. सिमेंटवरील जीएसटी देखील 28 टक्के वरून 18 टक्के पर्यंत कमी झाला आहे, यामुळे लोकांचे घरांचे स्वप्न स्वस्त झाले आहे. अनेक औषधांवरील जीएसटी शून्यावर आणण्यात आला आहे. छोट्या कार आणि मोटारसायकली (350 सीसी), टीव्ही आदी गोष्टी 28 टक्क्यांवरून 18 टक्क्यांवर आणण्यात आल्या आहेत.

advertisement

‎‎सरकारने जी नवीन जीएसटी प्रणाली लागू केली आहे, त्याचं आम्ही सर्वजण स्वागत करतो. यामुळे आम्हाला देखील याचा फायदा होणार आहे आणि त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना देखील याचा फायदा होणार आहे. विशेष करून किराणावरती जीएसटी कमी केली आहे आणि जे शेतकऱ्यांसाठी लागणारं साहित्य त्याच्यावरची देखील जीएसटी कमी झाली आहे, यामुळे नक्कीच त्यांना फायदा होणार आहे, असं व्यापारी निलेश सोमानी म्हणाले आहेत.

advertisement

सरकारने औषधी वरील जीएसटी कमी केली आहे याचं मी खूप खूप स्वागत करतो. कारण की जे गोरगरीब लोक आहेत त्यांना याचा नक्कीच फायदा होणार आहे आणि सर्वच औषधांवरचा जीएसटी सरकारने काढून टाकायला हवाय, असं व्यापाऱ्यांनी सांगितलं.

मराठी बातम्या/मनी/
GST 2.0: नवीन जीएसटी प्रणालीचे स्वागतच, वस्तू स्वस्त होणार, छ. संभाजीनगरमधील व्यापारी नेमकं काय म्हणाले? Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल