TRENDING:

Business Success: फक्त जिद्द पाहिजे! नोकरी सोडली अन् सुरू केली रांगोळी विक्री, आता लाखात कमाई!

Last Updated:

Business Success: एखाद्या महिलेनं ठरवलं तर ती उद्योग क्षेत्रात मोठी भरारी घेऊ शकते. नाशिकमधील प्रणाली पाटील रांगोळी व्यवसायातून लाखोंची कमाई करत आहेत.

advertisement
नाशिक: एखाद्या महिलेनं ठरवलं तर ती कोणत्याही क्षेत्रात मोठं यश संपादन करू शकते. नाशिकच्या प्रणाली पाटील यंनी हेच सिद्ध करून दाखलंय. उच्चशिक्षित प्रणाली यांनी कोरोना काळात नोकरीचा राजीनामा दिला आणि स्वत:चा एक छोटासा व्यवसाय सुरू केला. मोठ्या मेहनतीने रांगोळी आणि त्याच्याशी संबंधित साहित्याच्या व्यवसायात त्यांचा चांगाला जम बसला असून आता महिन्याची कमाई लाखाच्या घरात आहे. प्रणाली यांची हीच यशोगाथा लोकल18 च्या माध्यमातून जाणून घेऊ.
advertisement

नाशिकमधील प्रणाली पाटील यांचं शिक्षण एम.कॉम. पर्यंत झालं आहे. त्यांनी एका मल्टिनॅशनल कंपनीत नोकरी केली. साधारण पाच-सहा वर्षे नोकरी केल्यानंतर त्यांनी स्वत:चा बिझनेस करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला पतीचाही पाठिंबा होता. त्यामुळे नोकरी सोडली आणि पीएफच्या पैशातून व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेताल. ‘द राहुल रांगोळी’ या नावाने त्यांनी आपला नवा व्यवसाय सुरू केला.

advertisement

Business Success: संकटं अडवत होती, पण ती थांबली नाही! नोकरी सोडली अन् सुरू झाला मुंबईचा फेमस ब्रँड

प्रणाली यांच्याकडे विविध प्रकारच्या रांगोळी आणि रांगोळीसाठी आवश्यक विविध साहित्य होलसेल आणि रिटेल दरात मिळते. तसेच नवीन उद्योजकांना देखील होलसेल दरात त्या रांगोळी पुरवतात. त्यामुळे 3-4 वर्षांत या व्यवसायात त्यांचा चांगला जम बसला.

advertisement

रांगोळी व्यवसायच का?

रांगोळी हा प्रणाली यांचा पारंपारिक व्यवसाय आहे. त्यांचे सासरे आधी हाच व्यवसाय करत होते. त्यामुळे हाच व्यवसाय पुढे नेण्याचा निर्णय त्यांनी घेतला. आता राहुल रांगोळी नावाचा ब्रँड प्रसिद्ध आहे. केवळ महाराष्ट्रच नाही तर भारत आणि भारताबाहेरही राहुल रांगोळी पोहोचली आहे. तसेच आता दर महिन्याला 1 लाखाच्या वरती कमाई देखील होत असल्याचं प्रणाली सांगतात.

advertisement

होलसेल दरात रांगोळी साहित्य

प्रणाली यांच्याकडे रांगोळीशी संबंधित विविध प्रॉडक्ट्स मिळतात. एमडीएफ फॉल्यूमर, मेटल, वुडन, प्लास्टिक आणि फॅब्रिक रांगोळी अशा रांगोळीच्या विविध साच्यांचे विविध प्रकार उपलब्ध आहेत. ज्यांना स्वत:चा व्यवसाय सुरू करायचा असेल ते अगदी होलसेल दरात या ठिकाणाहून खरेदी करू शकतात. तसेच आपला व्यवसाय सुरू करू शकतात.

लोकेशन काय?

advertisement

नाशिकमध्ये ‘द राहुल रांगोळी’ शॉप नंबर 59 विश्रामबाग कमर्शियल कॉम्प्लेक्स चित्र मंदिर टॉकीजच्या मागे वावरे लेन मेन रोड या ठिकाणी दुकान आहे.

मराठी बातम्या/मनी/
Business Success: फक्त जिद्द पाहिजे! नोकरी सोडली अन् सुरू केली रांगोळी विक्री, आता लाखात कमाई!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल