TRENDING:

डिसेंबर पार्टीसाठी लोकेशन शोधताय? मुंबईत 'या' ठिकाणी आहे, युनिक कॅफे; आत्ताच चेक करा

Last Updated:

मुंबई: डिसेंबर महिना सुरू होताच पार्टी, सेलिब्रेशन आणि बाहेर फिरायला जाण्याची लगबग वाढू लागते. वर्षाचा शेवटचा महिना नेहमीच उत्साहाचा मानला जातो आणि त्यामुळे अनेक जण एखादं वेगळं, लक्षवेधी ठिकाण शोधत असतात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: डिसेंबर महिना सुरू होताच पार्टी, सेलिब्रेशन आणि बाहेर फिरायला जाण्याची लगबग वाढू लागते. वर्षाचा शेवटचा महिना नेहमीच उत्साहाचा मानला जातो आणि त्यामुळे अनेक जण एखादं वेगळं, लक्षवेधी ठिकाण शोधत असतात. विरारमध्ये असेच एक ठिकाण सध्या चर्चेत आले आहे—द आर्ट टेबल कॅफे.
advertisement

साध्या कॅफेसारखं फक्त खाणं-पिणं एवढ्यावर न थांबता, इथे एक वेगळाच अनुभव दिला जातो. या कॅफेमध्ये इंडियन सीटिंगमध्ये बसण्याची सोय असून, खाण्यासोबतच विविध प्रकारच्या आर्ट अ‍ॅक्टिव्हिटीज करण्यात ग्राहकांना मजा घेता येते. टोट बॅग पेंटिंग, कॅनव्हास पेंटिंग, विणकाम शिकवण्याच्या अ‍ॅक्टिव्हिटीज आणि छोटे गेम्स यामुळे हे ठिकाण तरुणांमध्ये अधिक लोकप्रिय होत आहे. डिसेंबर किंवा न्यू इयर साजरा करण्यासाठी एखादा मस्त अनुभव हवा असला तर इथे मिळणाऱ्या अ‍ॅक्टिव्हिटीजमुळे ग्राहकांना क्रिएटिव्ह वातावरणात वेळ घालवता येतो.

advertisement

विशेष म्हणजे, इथला मेन्यू खूपच किफायतशीर आहे. दर फक्त ₹50 पासून सुरू होतात. इथली पहाडी तुपा मॅगी, विविध बर्गर्स, पिझ्झा, मिल्कशेक्स आणि कोल्ड्रिंक्स ग्राहकांना आकर्षित करत आहेत. हा कॅफे दोन मित्रांनी सुरू केला आहे — अनिकेत पाटील आणि प्रथमेश सातार्डेकर. दोघेही एकत्र शाळा-कॉलेजमध्ये शिकलेले असून, पुढे जाऊन वेगवेगळ्या क्षेत्रात काम केले. परंतु स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असल्यामुळे त्यांनी एक वेगळा कॅफे तयार करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या प्रयत्नामुळे विरारमध्ये एक आगळंवेगळं ठिकाण उभं राहिलं आहे, जिथे कला आणि फूडचा सुंदर संगम अनुभवायला मिळतो.

advertisement

लोकेशन:

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
मक्याच्या दरात मोठी घसरण, शनिवारी सोयाबीन आणि कांद्याला किती मिळाला दर?
सर्व पहा

द आर्ट टेबल कॅफे हे विरार स्टेशनपासून सुमारे दहा मिनिटांच्या अंतरावर, चिखल डोंगरी रोडवरील श्री समर्थ इंटरनॅशनल शाळेजवळ, विरार वेस्ट येथे आहे.

मराठी बातम्या/मुंबई/
डिसेंबर पार्टीसाठी लोकेशन शोधताय? मुंबईत 'या' ठिकाणी आहे, युनिक कॅफे; आत्ताच चेक करा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल