या कार्यक्रमाबाबत माहिती देताना संस्थेचे सदस्य अथर्व नाईक म्हणाले, विठोबा जसा आपल्या भक्तांसाठी कंबरेवर हात ठेवून उभा असतो, तसंच आपले बेस्टचे कंडक्टर रोज प्रवाशांसाठी तासन्तास उभे राहतात. प्रवाशांना सुरक्षित आणि वेळेत सेवा देणं हीसुद्धा एक प्रकारची भक्ती आहे. म्हणूनच आम्ही बेस्ट विठ्ठल हा उपक्रम हाती घेतला आणि या सन्मानातून त्यांच्या सेवेला मान्यता दिली.
advertisement
Ashadhi Wari 2025: वारीत वारकरी इतके आनंदी का असतात? संशोधनातून आश्चर्यकारक माहिती समोर
ही संस्था गेली पाच वर्षे बेस्ट कर्मचारी आणि प्रवासी यांच्यामध्ये सकारात्मक नातं निर्माण करण्यासाठी सतत कार्यरत आहे. बेस्टसाठी आणि प्रवाशांसाठी एक सेतू म्हणून ती काम करत असून कर्मचाऱ्यांच्या श्रमांना सामाजिक सन्मान मिळावा, हा संस्थेचा प्रमुख हेतू आहे.
सन्मानित झालेल्या कंडक्टर आणि ड्रायव्हर्सनीही आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले, आम्हाला प्रत्यक्ष पंढरपूरला जाऊन विठोबाला भेटायला मिळालं नाही, पण आम्ही समाधानी आहोत कारण आमचे प्रवासीच आमचे विठ्ठल-रखुमाई आहेत. त्यांच्या सेवेत राहणं म्हणजेच खऱ्या अर्थाने विठोबाची सेवा करणं.
या उपक्रमामुळे बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मनात आनंद आणि अभिमानाची भावना निर्माण झाली असून, त्यांच्या सेवाभावाला एक वेगळीच ऊर्जा मिळाली आहे.