TRENDING:

धक्का लागल्यानं अपहरण, नंतर हत्या; संकेत भोसलेसोबत भिवंडीत त्या रात्री काय घडलं? INSIDE STORY

Last Updated:

संकेत भोसले या मारहाणीत जबर जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी मुंबई येथील रुग्णालयात दाखल केले. पण त्याची जीवनमरणाशी सुरू असलेली झुंज सातव्या दिवशी अपयशी ठरली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सुनिल घरत, भिवंडी : फेब्रुवारी रोजी भिवंडी महाविद्यालयाच्या बाहेर धक्का लागल्याच्या किरकोळ वादातून झालेल्या शुल्लक हाणामारीची घटना घडली होती. यानंतर युवकांच्या टोळक्याने अल्पवयीन संकेत सुनिल भोसले मुलाचे अपहरण केलं होतं. संकेत भोसलेला जबर मारहाण केली होती. पण मुंबई येथे उपचारा दरम्यान त्याचा बुधवारी दुर्दैवी अंत झाला आहे. या मृत्यूची वार्ता कळताच धामणकर नाका ते वऱ्हाळा देवी रोड कामतघर या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. मारहाण करणाऱ्या सर्व आरोपींना पोलीस जोपर्यंत अटक करत नाहीत तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी संतप्त भावना नागरिकांनी व्यक्त केले आहे.
News18
News18
advertisement

शहरातील बी एन एन महाविद्यालयाबाहेर 14 फेब्रुवारी रोजी देवा कैलास धोत्रे याला संकेत भोसले व त्यासोबत असलेल्या काही युवकांचा धक्का लागला. त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली होती. त्यानंतर देवा धोत्रे याने आपले वडील शिवसेना उपशहरप्रमुख कैलास धोत्रे यांना ही माहिती दिली. त्यांनी आपल्या सोबत आठ दहा जणांना घेऊन येत त्याठिकाणी मारहाण केली. कैलास धोत्रे सोबत असलेल्या गुंडांनी संकेत भोसले याचे अपहरण केले आणि आपल्या हद्दीत नेऊन बेदम मारहाण केली.

advertisement

संकेत भोसले या मारहाणीत जबर जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी मुंबई येथील रुग्णालयात दाखल केले. पण त्याची जीवनमरणाशी सुरू असलेली झुंज सातव्या दिवशी अपयशी ठरली. रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला. संकेत राहत असलेल्या वऱ्हाळ देवी नगर परिसरात यामुळे शोककळा पसरली आहे. संतप्त नागरिकांनी धामणकर नाका ते कामतघर रोड या रस्त्यावरील दुकाने वाहतूक बंद पाडून आपला संताप व्यक्त केला आहे.

advertisement

पोलिसांनी देवा धोत्रेला किरकोळ मारहाण झाली असताना संकेत व त्याचा मित्र विवेक डोळस यांच्या विरोधात गंभीर गुन्हा नोंदवला. मात्र संकेतला अपहरण करून जीव ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना पोलीस पाठीशी घालत असल्याचा आरोप आर पी आय आठवले गटाचे शहराध्यक्ष महेंद्र गायकवाड यांनी केला आहे. शिवसेना शिंदे गटाचा वरदहस्त असल्याने त्यांच्यावर पोलिस कोणतीही कारवाई करीत नसून आरोपी सात दिवसांपासून मोकाट आहे.  आरोपींना अटक होत नाही तो पर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा इशारा महेंद्र गायकवाड यांनी दिला आहे. तर या दुर्दैवी घटने नंतर धामणकर नाका परिसरात व अनेक वाहनांवर दगडफेक करण्यात आल्याच्या घटना घडल्या असून पोलिसांनी कायदा हातात न घेण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
धक्का लागल्यानं अपहरण, नंतर हत्या; संकेत भोसलेसोबत भिवंडीत त्या रात्री काय घडलं? INSIDE STORY
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल