उज्वल निकम यांची थोडक्यात माहिती
उज्ज्वल निकम यांचा जन्म 30 मार्च 1953 साली झाला. सरकारी वकील म्हणून त्यांनी अनेक बहुचर्चित खटल्यांमध्ये महत्त्वाची कामगिरी बजावली. दहशतवादी अजमल कसाबविरुद्ध खटल्यात सरकारी वकील म्हणून काम पाहिले. उज्ज्वल निकम यांना ’प्रमोद महाजन’ स्मृती पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
उज्ज्वल निकम हे विशेष सरकारी वकील आहेत. ज्यांनी प्रामुख्याने हत्या आणि दहशतवादाच्या खटल्यांवर काम केले आहे. 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोट, गुलशन कुमार खून प्रकरण, प्रमोद महाजन हत्या प्रकरण आणि 2008 च्या मुंबई हल्ल्यातील संशयितांवर खटला चालवण्यास त्यांनी मदत केली. 2013 मुंबई सामूहिक बलात्कार प्रकरण, 2016 कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणात ते विशेष सरकारी वकील देखील होते. 26/11 मुंबई हल्ल्याच्या खटल्यात राज्याच्या वतीने उज्ज्वल निकम यांनी युक्तिवाद केला.
advertisement
वाचा - कांदा निर्यातबंदी उठवली! राजू शेट्टींचे शेतकऱ्यांना मोठं आवाहन, म्हणाले महायुतीचे सर्व उमेदवार
पुनज महाजन यांचा पत्ता कट
उत्तर मध्य मुंबई मतदारसंघासाठी कोणता उमेदवार दिला जाणार याची गेल्या काही दिवसांपासून चर्चा रंगली होती. अखेरीस काँग्रेसने उमेदवार जाहीर केल्यानंतर भाजपने धक्कातंत्राचा वापर केला आहे. ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. उज्ज्वल निकम आता थेट काँग्रेसच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांच्या विरोधात निवडणूक लढवणार आहे. विशेष म्हणजे, निकम यांच्या नावाच्या आधी आशिष शेलार यांच्यापासून ते अभिनेत्री माधुरी दिक्षीत, अनुराधा पौडवाल अशा अनेक सेलिब्रिटीजची नाव पडताळली गेली होती. पण निकम यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.
