Raju Shetti : कांदा निर्यातबंदी उठवली! राजू शेट्टींचे शेतकऱ्यांना मोठं आवाहन, म्हणाले महायुतीचे सर्व उमेदवार

Last Updated:

Raju Shetti : केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यातबंदी उठवली आहे. या निर्णयावर स्वाभीमानी राजू शेट्टी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

स्वाभीमानी संघटनेचे राजू शेट्टी
स्वाभीमानी संघटनेचे राजू शेट्टी
सांगली, (आसिफ मुरसल, प्रतिनिधी) : लोकसभा निवडणुका सुरू असतानाच केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. सरकारनं कांद्याच्या निर्यातीवरील बंदी उठवली (Onion Export Ban Lift) आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Minister Amit Shah) यांच्या उपस्थितीत केंद्रीय मंत्री समितीची बैठक झाली आहे. या बैठकीत निर्णय घेण्यात आला. दरम्यान, सरकारनं जरी कांदा निर्यातील परवानगी दिली असली तरी, त्यावर मर्यादा ठेवण्यात आली आहे. 3 लाख मेट्रिक टन कांदा निर्यात करण्यास समितीनं परवानगी दिली आहे. यावर स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शेतकऱ्यांनी डोळे वटारले आणि निर्यात बंदी उठवली आहे, शेतकऱ्यांची ताकद सरकारला दाखवण्यासाठी त्यांचे उमेदवार धडाधड पाडा, असे आवाहन राजू शेट्टी यांनी केलं आहे.
राजू शेट्टींची सरकारवर टीका
शेतकऱ्यांनी डोळे वटवल्यानंतर सरकार घाबरून गेलं. कांदा उत्पादक शेतकऱ्यांनाही माझी विनंती आहे. डोळे वटवल्यानंतर सरकार निर्णय घेत असेल तर त्यांचे उमेदवार पाडा तरच त्यांना कांदा उत्पादका शेतकऱ्यांची ताकद कळेल. असे वक्तव्य राजू शेट्टी यांनी केले आहे. गेल्या अनेक महिन्यापासून शेतकरी कांद्याच्या निर्यात बंदीच्या विरोधामध्ये आंदोलन करत रस्त्यावर उतरत होते. पण सरकार ऐकायला तयार नव्हतं. आता लोकसभेच्या निवडणुका जवळ आल्याने सरकारला जाग आली. भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षांचे उमेदवार धडाधड पराभूत होणार आहे, अशी लक्षणे दिसू लागली. मग सरकार जागे झाले. आणि निर्यातीस परवानगी दिली. याचं आम्ही स्वागत करतो. पण हा फार उशिराने घेतलेला निर्णय आहे. त्याच्यावरची बंधने काढून टाकावी अशी आमची मागणी आहे.
advertisement
आज घेतलेला निर्णय पुन्हा एकदा तपासून पहावा : अमोल कोल्हेंची शंका
कांद्यावरील निर्यातबंदी उठणं हा स्वागतार्ह निर्णय आहे. मात्र, आज घेतलेला निर्णय पुन्हा एकदा तपासून पहावा, असं म्हणत शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हेंनी शंका उपस्थित केली आहे. संत्रा आणि द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या निर्णयाचा दाखला देताना, बांग्लादेश सारख्या छोट्या देशासमोर स्वतःला विश्वगुरु म्हणवणाऱ्यांना गुडघे टेकायला लागले होते. याची आठवण कोल्हेंनी कांदा निर्यातबंदी निर्णयावर शंका उपस्थित करताना करून दिली.
advertisement
आधी फक्त गुजरातच्या दोन हजार मेट्रिक टन कांदा निर्यातीवरील बंदी हटविण्यात आली होती. त्यावर कोल्हेंसह मविआ नेते तुटून पडले. यामुळं महाराष्ट्रात कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये कमालीचा संताप निर्माण झाला. ही बाब भाजप सरकारच्या लक्षात आली. याची किंमत लोकसभा निवडणुकीत मोजावी लागू नये म्हणून भाजपने पुढच्या काही तासांत गुजरातसह देशभरातील 99 हजार मेट्रिक टन कांद्यावरील निर्यातबंदी हटविण्याचा निर्णय तातडीनं घेतला. पण पूर्वानुभव पाहता कोल्हेंनी हा निर्णय तपासून घ्यावा, अशी शंका उपस्थित केली आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सांगली/
Raju Shetti : कांदा निर्यातबंदी उठवली! राजू शेट्टींचे शेतकऱ्यांना मोठं आवाहन, म्हणाले महायुतीचे सर्व उमेदवार
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement