TRENDING:

मुंबईकर, ऐन उन्हाळ्यात तुमचं पाणी बंद होऊ शकतं, 31 मार्चपर्यंत हे कराच, महापालिकेकडून डेडलाईन

Last Updated:

Mumbai Water Supply: पाणीपुरवठा सुरुळीत चालू ठेवण्यासाठी महापालिकेनं मुंबईकरांना आवाहन केलं आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सर्व जलजोडणीधारकांनी प्रलंबित जलदेयकांचा भरणा येत्या 31 मार्चपूर्वी करावा, असे आवाहन मुंबई महापालिका प्रशासनाने केले आहे. निर्धारित मुदतीत थकीत देयके न भरल्यास संबंधित जलजोडणी खंडित करण्याची कारवाई करण्यात येईल. त्यामुळे नागरिकांनी वेळेत देयके भरून कोणतीही गैरसोय टाळावी असे प्रशासनाने नमूद केले आहे.
मुंबईकर, ऐन उन्हाळ्यात तुमचं पाणी बंद होऊ शकतं, 31 मार्चपर्यंत हे कराच, महापालिकेकडून डेडलाईन
मुंबईकर, ऐन उन्हाळ्यात तुमचं पाणी बंद होऊ शकतं, 31 मार्चपर्यंत हे कराच, महापालिकेकडून डेडलाईन
advertisement

पालिकेच्या जल अभियंता विभागाकडून थकीत जलदेयकांची वसुली करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. शहरातील जलजोडणीधारकांकडे मोठ्या प्रमाणावर थकबाकी असल्याने त्याची वसुली करण्यासाठी प्रशासनाने विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. नागरिकांनी आपले देयक तपासून तातडीने त्याचा भरणा करावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.

वसई-भाईंदर रो-रो फेरी सेवेबाबत मोठा निर्णय, गैरसोय टाळण्यासाठी पाहा वेळापत्रक

advertisement

काही नागरिकांना जलदेयकाची प्रत प्राप्त झालेली नसल्यास त्यांनी संबंधित प्रशासकीय विभाग कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच पालिकेच्या ‘अॅक्वा’ या संकेतस्थळावरूनही जलदेयकाची माहिती मिळू शकते. नागरिकांना या संकेतस्थळावरून आपले देयक तपासता येते तसेच त्याची प्रत डाउनलोड करण्याची सुविधाही उपलब्ध आहे. याशिवाय संबंधित सहाय्यक अभियंता (जलकामे) यांच्या कार्यालयातूनही देयकाची प्रत मिळू शकते असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

advertisement

View More

नागरिकांना जलदेयके भरणे अधिक सोयीचे व्हावे यासाठी विविध पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. शहरातील विभाग कार्यालयांमध्ये असलेल्या नागरी सुविधा केंद्रांवर जाऊन देयके भरता येतात. याशिवाय पालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावरूनही ऑनलाइन पद्धतीने जलदेयकाचा भरणा करण्याची सुविधा उपलब्ध आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
लिंबाच्या दरात मोठी उलथापालथ, कांदा आणि द्राक्षाला काय मिळाला भाव? इथं चेक करा
सर्व पहा

तसेच, एनईएफटी, ऑनलाइन व्यवहार आणि मोबाईल अॅप यांसारख्या डिजिटल माध्यमांतूनही नागरिकांना जलदेयके भरता येणार आहेत. त्यामुळे सर्व जलजोडणीधारकांनी 31 मार्चपूर्वी प्रलंबित जलदेयकांचा भरणा करून संभाव्य कारवाई टाळावी असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
मुंबईकर, ऐन उन्हाळ्यात तुमचं पाणी बंद होऊ शकतं, 31 मार्चपर्यंत हे कराच, महापालिकेकडून डेडलाईन
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल