मुंबई भाजप आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या महायुतीने बहुमतासाठीची मॅजिक फिगर गाठली आहे. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने 26, भाजपनला ८८ जागा मिळाल्या आहेत. शिवसेना शिंदेच्या 26 विजयी उमेदवारांची समोर आली आहे.
शिवसेनेचे 20 उमेदवार कोण?
| वॉर्ड | विजयी | विजयी पक्ष | |
| 1 | रेखा यादव | शिवसेना | |
| 4 | मंगेश पंगारे | शिवसेना | |
| 5 | संजय घाडी | शिवसेना | |
| 6 | दिक्षा कारकर | शिवसेना | |
| 18 | संध्या दोशी | शिवसेना | |
| 42 | धनश्री भराडकर | शिवसेना | |
| 51 | वर्षा टेंबलकर | शिवसेना | |
| 91 | सगुण नाईक | शिवसेना | |
| 146 | समृद्धी काते | शिवसेना | |
| 147 | प्रज्ञा सुनील सदाफुले | शिवसेना | |
| 156 | अश्विनी माटेकर | शिवसेना | |
| 160 | किरण लांडगे | शिवसेना | |
| 161 | विजयेंद्र शिंदे | शिवसेना | |
| 188 | भास्कर शेट्टी | शिवसेना | |
| 209 | यामिनी जाधव | शिवसेना | |
| 166 | मीनल टूरदे | शिवसेना | |
| 175 | मंगेश सातमकर | शिवसेना | |
advertisement
मुंबई महानगरपालिकेच्या मतमोजणीत संध्याकाळपर्यंत चित्र पूर्णपणे बदलताना दिसत आहे. सकाळच्या सत्रात एकतर्फी वाटणारी ही लढत आता थेट अटीतटीमध्ये रूपांतरित झाली आहे. महायुतीने (भाजप–शिंदे गट) बहुमताचा आकडा गाठल्याचा दावा केला असला, तरी अनेक महत्त्वाच्या वॉर्डांमध्ये ठाकरे गट आणि मनसेने दिलेल्या कडव्या झुंजीमुळे महायुतीच्या गोटात धाकधूक वाढली आहे. दुपारी भाजपकडून विजयाच्या जल्लोषासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला, मात्र मुंबई महापालिकेच्या विजयावर आक्रमक दावा करण्याऐवजी सावध भूमिका घेतल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले. त्यामुळे राज्यासह संपूर्ण देशाचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे.
मुंबईत कसं बदलणार चित्र?
मुंबईत सत्ता स्थापन करण्यासाठी 114 चा जादूई आकडा आहे. मुंबई महानगरपालिकेच्या हाती आलेल्या आकड्यानुसार सध्या भाजप आणि शिंदेंच्या युतीला 110 जागा मिळाल्या असून ठाकरे बंधू 72 जागांवर आहे. तर काँग्रेस 23 जागांवर असून इतर जागांवर 10 नगरसेवक आहे.या इतरमध्ये एमआयएमचे 8 नगरसेवक आहेत. यामुळे मुंबईत चित्र बदलण्याची शक्यता आहे. राज्यासह संपूर्ण देशाचे लक्ष मुंबई महानगरपालिकेकडे लागले आहे. ठाकरेंना धोबीपछाड करत मुंबईत भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने 114 चा जादू गाठण्यात यश मिळवले आहे.
हे ही वाचा :
