मुंबई महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदासाठी पुढील आठवड्यात निवड होणार आहे. त्यासाठी प्रशासनाच्या वतीने अधिसूचना जारी करण्यात आली आहे. आतापर्यंत जेव्हा नवे सभागृह अस्तित्वात येत असे, नवीन महापौराची निवड होत होती, तेव्हा कामकाज हे पीठासीन अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली व्हायचं पण आता प्रधान सचिव दर्जाच्या खालील पदावर असणाऱ्या किंवा सभागृहातील माजी वरिष्ट नियुक्त नगरसेवक पीठासन अधिकारी असणार नाही. केवळ आयुक्त वा प्रशासक पीठासन अधिकारी म्हणून काम पाहणार आहे.
advertisement
मागच्या पालिका सभागृहाचा कार्यकाळ संपून आता जवळपास तीन वर्षे होत आली आहेत. त्यामुळे मावळते महापौर ही संकल्पना मोडीत निघाली आहे. जुन्या नियमानुसार, ज्येष्ठ नगरसेवक पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहू शकतो. जुन्या नियमानुसार, उद्धव ठाकरे गटाच्या ज्येष्ठ नगरसेविका श्रद्धा जाधव यांना पीठासीन अधिकारी म्हणून कामकाज पाहण्याचा अधिकार होता. हा अधिकार काढून तो प्रधान सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याला देण्यात आला आहे. साहजिकच सध्याचे आयुक्त भूषण गगराणी हेच पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहतील, यावर शिक्कामोर्तब झालं आहे.
