मोबाईल चोरी करणाऱ्या टोळीतील तीन आरोपी बोरिवली लॉकअपजवळ फिरत असल्याची गुप्त माहिती बोरिवली पोलिसांना मिळाली. त्यानंतर बोरिवली पोलिसांनी सापळा रचून तीन आरोपींना अटक केली. त्यांच्या झडतीदरम्यान आठ मोबाईल जप्त करण्यात आले. अधिक तपास केल्यानंतर बोरिवली पोलिसांनी आरोपींकडून एकूण 27 मोबाईल जप्त केले आहेत. ज्याची किंमत सुमारे दोन लाख रुपये आहे. या मोबाईल चोर टोळीतील चार आरोपी अद्याप फरार आहेत. बोरिवली पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
advertisement
वसीम रईस अहमद शेख उर्फ मसा (30), मीत तुळशीराम शिंदे (23) आणि नीलेश जगदीश पटेल उर्फ कन्या (32) अशी अटक आरोपींची नावे आहेत. तिन्ही आरोपी मालाड पश्चिम मालवणी येथील रहिवासी आहेत. या तिघांवरही मुंबईतील विविध पोलीस ठाण्यात मोबाइल चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 10, 2023 3:37 PM IST
