राज्यात मागील आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे 22 जिल्ह्यांत तीन लाख 93 हजार 335 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अद्यापही नुकसानग्रस्त 10 हून अधिक जिल्ह्यांमधील पूर्ण आकडेवारी येणे बाकी असून साडेचार लाख हेक्टरहून अधिक शेतीवरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज मांडला गेला आहे. मागील आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसाने सहा जणांना मृत्यू झाला होता. तर 161 जनावरे दगावली होती.
advertisement
अवकाळी आणि गारपीटीने रब्बीतील कापूस, कांदा, द्राक्ष, केळी, मोसंबी, डाळिंब, काढणीस आलेला भात, ज्वारी, गहू, हरभरा यांसह भाजीपाला आदी पिकांचे नुकसान झाले. यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान केले असून येथे 1 लाख 26 हजार 438 हेक्टरवरील पिकांचे नुकसान केले आहे. हरभरा, कापूस, तूर, गहू, भाजीपाला आणि फळपिकांचे मोठ्या प्रमाणात येथे नुकसान केले आहे.
वाचा - अवयव विक्री करायला आलेल्या शेतकऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात, 'मातोश्री' तून नेलं पोलीस ठाण्यात
हिंगोली
79 हजार 402 हेक्टरवरील भाजीपाला, तूर, कापूस, सीताफळ, पेरू, भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे.
नाशिक
कळवण, नांदगाव, नाशिक, त्र्यंबकेश्वर, सटाणा, दिंडोरी, पेठ, निफाड, सुरगाणा, इगतपुरी, सिन्नर, चांदवड, येवला येथील, 33 हजार 338 हेक्टरवरील कांदा, द्राक्षे, सोयाबीन, मका, गहू, ऊस आीण फळपिकांचे नुकसान झाले आहे.
छत्रपती संभाजीनगर
छत्रपती संभाजीनगर, पैठण, गंगापूर, वैजापूर, कन्नड, खुलताबाद, सिल्लोड, सोयगाव, फुलंब्री तालुक्यातील 45 हजार 783 हेक्टर क्षेत्रावरील केळी, पपई, मका पिकांचे नुकसान झाले आहे.
