मेल-एक्स्प्रेसमध्ये यांनी वसूल केला सर्वाधिक दंड
मध्य रेल्वेच्या मेल-एक्स्प्रेस मार्गावर सर्वाधिक महसूल मोहमद शाम यांनी जमा केला. त्यांनी 10 हजार 111 प्रकरणांतून 76 लाख 7 हजार रुपयांचा महसूल गोळा केला. तर, त्याच मार्गावर दुसऱ्या क्रमांकावर 9 हजार तीनशे प्रकरणांत 72 लाख 95 हजारांचा दंड एस. नैनानी यांनी वसूल केला. एच. सी. तेंडुलकर यांनी उपनगरीय मार्गावर 6 हजार 658 प्रवाशांकडून 32 लाख 93 हजार 920 लाख दंडाच्या स्वरुपात वसूल केले. तर महिला टीसीमध्ये सुधा द्विवेदी यांनी सर्वाधिक 11 हजार 321 फुकट्या प्रवाशांना पकडून त्यांच्याकडून 32 लाख 16 हजार रुपयांचा दंड वसूल केला.
advertisement
विमानाच्या टॉयलेटमधून निघत होता धूर, क्रू मेंबरने डोकावलं, दोघा तरुणांचं भलतंच कांड, थेट तुरुंगात
1200 टीसींकडून कारवाई
मध्य रेल्वेकडून जवळपास 1200 पेक्षा अधिक तिकीट तपासणीसांच्या माध्यमातून विनातिकीट प्रवास करणाऱ्यांची तपासणी केली जाते. यात 175 पेक्षा जास्त महिला टीसींचा देखील समावेश आहे. गतवर्षी सप्टेंबरमध्ये दंडाच्या रकमेत वाढ करण्याचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठविला होता. यापूर्वी सन 2004 मध्ये दंडाची रक्कम वाढवण्यात आली होती. आता 20 वर्षांनी फुकट्या प्रवाशांना रोखण्यासाठी दंडाची रक्कम वाढवण्याची मागणी होतेय.
