छावा संघटनेचा सरकारला इशारा
आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला बगल देण्यासाठी सुपारी फेक, शेण फेक अशा घटना घडवून लक्ष दुसरीकडे वळविळ्याचा प्रयत्न होत आहे. जर समाजाचा आणि आरक्षणासाठीच्या लढाईचा उपयोग राजकारण करण्यासाठी कोणी करत असेल तर छावा संघटना त्यांना ठोकून काढेल, असा आक्रमक इशारा छावा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. यासोबतच जर येत्या विधानसभा निवडणुकीच्या आत आरक्षणाचा मुद्दा सोडवला नाही तर मराठा समाजातील तरुण नक्षलवादी होतील आणि तुमचा काटा काढतील, असा देखील इशारा छावा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. याबरोबर ओबीसीमधुनच नाही तर कुठूनही आरक्षण द्या अस देखील यावेळी छवाचे अध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील यांनी म्हटलं आहे.
advertisement
वाचा - ठाकरेंना मोठा धक्का; शिलेदारानं साथ सोडली, 500 गाड्यांचा ताफा घेऊन मुंबईला रवाना
मनोज जरांगे पाटील 29 ऑगस्टला जाहीर करणार भूमिका
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांच्यामुळे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीच्या अडचणी वाढू शकतात. त्यांनी स्वतः निवडणूक लढविण्याचे संकेतही दिले आहेत. जरांगे म्हणाले की, राज्यातील 288 विधानसभा जागांवर निवडणूक होणार असून, सर्व जागांवर मराठा उमेदवार विजयी होतील. इतर राखीव जागांवर इतर जातीचे उमेदवार निवडले जातील. मी निवडणूक लढवणार की नाही याचा निर्णय 29 ऑगस्टला होणार आहे.
