TRENDING:

Job Opportunities : कोणतीही परीक्षा नाही! सरकारी कंपनीत नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी; अर्ज कुठे करायचा?

Last Updated:

Government Jobs : कोल इंडिया लिमिटेडमध्ये ट्रेनी पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. 125 जागांसाठी ही संधी असून पात्र उमेदवारांना 22 हजार रुपये पगार मिळणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी ही अतिशय महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी आहे. कोल इंडिया लिमिटेडकडून ट्रेनी पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली असून यासंदर्भातील अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती नुकतेच शिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना सरकारी क्षेत्रात करिअर सुरू करण्याची उत्तम संधी उपलब्ध होणार आहे.
News18
News18
advertisement

जाणून घ्या सविस्तर माहिती

कोल इंडिया लिमिटेडमध्ये एकूण 125 रिक्त पदांसाठी ही भरती होणार आहे. या पदांसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 26 डिसेंबर 2025 पासून सुरू होणार असून अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 15 जानेवारी 2026 अशी निश्चित करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या कालावधीतच अर्ज करणे आवश्यक आहे.

advertisement

या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी इंटरमिजिएट (12वी) किंवा चार्टर्ड अकाउंटंट (CA) परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. उमेदवारांचे कमाल वय 28 वर्षे असावे अशी अट ठेवण्यात आली आहे. मात्र, आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना शासन नियमांनुसार वयोमर्यादेत सवलत दिली जाणार आहे.

निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 22,000 रुपये मानधन दिले जाणार आहे. ट्रेनी पदावर काम करताना उमेदवारांना प्रत्यक्ष अनुभवासोबतच विविध कौशल्ये शिकण्याची संधी मिळणार असून भविष्यातील करिअरसाठी ही नोकरी उपयुक्त ठरणार आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
Gajar Halwa: गाजर हलव्याची परफेक्ट रेसिपी, असा बनवाल तर बोटं चाखत बसाल, Video
सर्व पहा

अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी सर्वप्रथम कोल इंडिया लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइट coalindia.in ला भेट द्यावी. त्यानंतर “Apply Online” या लिंकवर क्लिक करून मोबाईल नंबर व ई-मेल आयडीच्या माध्यमातून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी. नोंदणी झाल्यानंतर आवश्यक कागदपत्रांच्या स्कॅन प्रती अपलोड करून अर्ज सबमिट करावा. अर्ज सादर केल्यानंतर त्याची प्रिंटआउट काढून भविष्यासाठी जतन करून ठेवणे आवश्यक आहे.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
Job Opportunities : कोणतीही परीक्षा नाही! सरकारी कंपनीत नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी; अर्ज कुठे करायचा?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल