देवेंद्र फडणवीस 2021मध्ये विरोधी पक्षनेते असताना त्यांनी पत्रकार परिषद घेत रश्मी शुक्ला यांच्या पत्राचा दाखला देत भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. या पत्रामध्ये त्यांनी कॉल रेकॉर्डिंगचा तपशीलही दिला होता. या पत्रकार परिषदेनंतरच फोन टॅपिंग प्रकरणी महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांनी तक्रार दाखल केली होती.
Dharashiv : काकांवर आरोप करणाऱ्या राष्ट्रवादीच्या माजी आमदाराला पुतण्याचा इशारा, नोटीस पाठवणार
advertisement
बेकायदा फोन टॅपिंग आणि गोपनीय कागदपत्रे उघड केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. राज्याच्या गुप्तचर विभागाच्या प्रमुख असताना रश्मी शुक्ला यांनी राजकीय नेते आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचे फोन टॅपिंग केल्याचा आरोप करण्यात आला होता. दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे यांचे सरकार आल्यानंतर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला होता.
सीबीआयने या प्रकरणाचा तपास बंद करण्यासाठी महानगर दंडाधिकाऱ्यांकडे अहवाल सादर केला. सीबीआयशिवाय राज्य गुप्तचर विभागानेसुद्धा या प्रकरणाचा तपास बंद करण्यासाठी काही आक्षेप नसल्याचे सांगितले. यानंतरच न्यायालयाने मंगळवारी सीबीआयचा अहवाल स्वीकारत हे प्रकरण बंद केले.
