त्या दिवसी परुळेकरांसोबत काय घडलं?
परुळेकर यांच्या मोबाईलवर महानगर गॅसचे थकीत बिल भरण्याबाबत एक मेसेज आला. या मेसेजमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक केल्यावर त्यांना बिल भरण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं वाटलं, मात्र काही क्षणांतच त्यांच्या बँक खात्यातून मोठी रक्कम परस्पर वळवण्यात आली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तत्काळ बँक आणि पोलिसांकडे धाव घेतली.
advertisement
या प्रकरणी खेरवाडी पोलिस ठाण्यात 16 डिसेंबर रोजी दोन अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून सायबर तज्ज्ञांच्या मदतीने तपास सुरू असून आरोपींचा शोध घेतला जात आहे.
घटनांमध्ये होत आहे वाढ!
सायबर गुन्हेगार नागरिकांच्या दैनंदिन गरजांचा विशेषतहा गॅस, वीज, मोबाईल बिल यातून गैरफायदा घेत असल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी नागरिकांना अनोळखी मेसेजमधील लिंकवर क्लिक न करण्याचे आणि कोणतीही आर्थिक माहिती शेअर न करण्याचे आवाहन केले आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे.
