दोन भावांच्या सेम टू सेम चेहऱ्याला 'डिजियात्रा'ची सिस्टिम सुद्धा गडबडली. दोन्ही भावांच्या सेम टू सेम चेहऱ्यामुळे त्यांना मुंबई विमानतळावर प्रवेश नाकारण्यात आला आहे. एक सारखा चेहरा असल्याचं कारण देत त्यांना 'डिजियात्रा'ची सुविधा देण्यास तंत्रज्ञानाने नकार दिला. यामुळे दोन्हीही भावांना जुनी प्रक्रिया पूर्ण करत पुढे जावे लागले. या संबंधितचा एक व्हिडिओ शेअर करत प्रशांत मेनन यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. जो व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. प्रशांत मेनन यांचा व्हिडिओ पाहून अनेक नेटकऱ्यांकडून मजेशीर कमेंट करीत आहेत.
advertisement
प्रशांत मेनन यांनी शेअर केलेल्या व्हिडिओला 'हम जुडवा लोगों के लिये कुछ कीजिये डिजियात्रा' असं कॅप्शन देत शेअर केला. प्रशांत मेनन आपल्या जुळ्याभावासोबत विमानतळावर आल्यानंतर मात्र चेहरा साधर्म्यामुळे त्यांना तंत्रज्ञान प्रणालीने प्रवेश नाकारला. मेनन यांच्या पोस्टची 'डिजियात्रा'कडून दखल घेण्यात आली आहे. दिलगिरी व्यक्त करतानाच तुमची समस्या सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, असे त्यांनी उत्तर दिले. प्रशांत मेनन यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी रंजक प्रतिक्रिया दिल्या आहेत. 'सीता आणि गीता यांच्यापुढेही आपली प्रणाली गंडू शकते', अशी कमेंट एका युजरने केली आहे. 'अशी वेळ येईल तेव्हा काय करायचे, याचा विचार या तंत्रज्ञान प्रणालीच्या निर्मात्यांनी केला नाही का', असा सवालही अनेकांनी उपस्थित करत काहींनी यंत्रणेवर संताप व्यक्त केला.
