निवडणूक आयोग आज दुपारी तीन वाजता विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा करणार आहे. निवडणूक आयोगाकडून प्रसारमाध्यमांना पत्रकार परिषदेचं जे निमंत्रण पाठवण्यात आलं आहे, त्यामध्ये मात्र निवडणूक आयोगाकडून कोणत्याही राज्याचा उल्लेख करण्यात आलेला नाही. मात्र सूत्रांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार आज निवडणूक आयोगाकडून हरियाणा आणि जम्मू काश्मिरमधील विधानसभा निवडणुकीच्या ताराखा जाहीर केल्या जाण्याची शक्यता आहे. हरियाणामध्ये एकाच टप्प्यात तर जम्मू काश्मिरमध्ये तीन ते पाच टप्प्यांमध्ये विधानसभेसाठी मतदान होऊ शकते.
advertisement
हरियाणा आणि महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ अनुक्रमे 3 नोन्हेंबर आणि 26 नोव्हेंबरला संपणार आहे. निवडणूक आयोगाकडून विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हरियाणा आणि जम्मू काश्मिरचा दौरा करण्यात आला आहे, मात्र महाराष्ट्राचा दौरा अद्याप बाकी आहे. त्यामुळे आजच्या पत्रकार परिषदेमध्ये निवडणूक आयोगाकडून हरियाणा आणि जम्मू-काश्मिरमधील निवडणूक तारखांची घोषणा होण्याची शक्यता आहे. तर महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक लांबणीवर जाण्याची शक्यता आहे.
