माकड पकडा आणि मिळवा तात्काळ पैसे
मुंबई शहरात वाढत्या माकडांच्या त्रासावर नियंत्रण आणण्यासाठी वन विभागाने ही भन्नाट योजना लागू केली आहे. या योजनेनुसार उपद्रवी तसेच लोकांना त्रास देणारी माकडे पकडणाऱ्यांना सरकारकडून प्रत्येकी 600 रुपये इतके मानधन दिले जाणार आहे. अलीकडेच मुंबईसह उपनगरांत माकड्यांचे घरांमध्ये घुसणे, अन्नपदार्थ लोकांकडून हिसकावणे आणि मुलांना घाबरवणे यासारख्या घटना वाढलेल्या आहेत. त्यामुळे नागरिकांकडून वारंवार तक्रारी होत आहेत.
advertisement
या सर्व प्रकारांचा विचार करुन वन विभागाने ही योजना तयार करण्याचे ठरवले आहे. ज्यात एक टीम बनवली जाणार आहे, ज्यात ही टीम माकडांच्या हालचालींवर लक्ष ठेवणार आहे आणि ते ज्या परिसरात जास्त दिसतात त्या ठिकाणी जाऊन त्यांना पकडेल. मात्र,त्यात महत्त्वाचे म्हणजे या विभागाकडे मनुष्यबळाची कमतरता असल्याने सामान्य लोकांनाही या मोहिमेत सहभागी होण्याची संधी देण्यात आली आहे
या योजने दरम्यान राज्य सरकारकडून माकडांची नसबंदी करण्याचा प्रस्ताव दोन वर्षांपूर्वी केंद्राकडे पाठवण्यात आला होता. शहरात माकडांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने हा उपाय अत्यंत गरजेचा आहे, असे राज्याने केंद्र सरकारला कळवले होते. मात्र हा प्रस्ताव अजूनही केंद्राच्या विचाराधीन असून तो प्रलंबित आहे. त्यामुळे माकडांचा वाढता त्रास कमी करण्यासाठी सध्या ही मोहीम राबवण्याशिवाय पर्याय नाही असेही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
