मनोहर जोशी यांचा जन्म २ डिसेंबर १९३७ रोजी रायगड जिल्ह्यातील नांदवी इथं झाला. गरीब कुटुंबात जन्मलेल्या मनोहर जोशी यांना लहानपणापासून संघर्ष करावा लागला. वडिलांसोबत भिक्षुकी करून पैसे मिळवले. सहावीला शिक्षणासाठी मामांकडे पनवलेला आहे. पण मामांची बदली झाल्यानं त्यांनी गोल्फ मैदानात बॉयची नोकरी केली. मित्राच्या खोलीत भाड्याने राहिले. जेवणाची सोय महाजन बाईंनी वारावर केली होती.
advertisement
नोकरी करत शिक्षण पूर्ण
अकरावीला शिकण्यासाठी मुंबईला बहिणीकडे. सहत्रबुध्दे क्लासमध्ये शिपायाची नोकरी करून शिक्षण केलं. किर्ती कॉलेजमधुन बी. ए. पूर्ण केल्यानंतर मुंबई महानगरपलिकेत क्लार्कची नोकरी केली. वयाच्या २७ व्या वर्षी एम.ए., एल एल. बी. झाले. तर वयाच्या ७२ व्या वर्षी पीएचडी पूर्ण केली. त्यांना डॉक्टर डी वाय पाटील विद्यापीठाकडून डी. लिट ही मानद पदवी मिळाली आहे.
Manohar Joshi : माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांचे निधन
कोहिनूर क्लास ते ग्रुप
दरम्यान, १९६१ ला नोकरी सोडून कोहिनूर या नावाने क्लासेस सुरू केले. त्यानं कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूट सुरू केली. शिक्षणापासून वंचित युवकांना तांत्रिक शिक्षण देऊन नोकरी किवा व्यवसायाच्या माध्यमातून स्वतःच्या पायावर उभे राहता यावे हा उद्देश होता. आज भारतभर ७० शाखा व दरवर्षी १२ हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना शिक्षण, कोहिनूर ग्रुप आज शिक्षण क्षेत्राबरोबरच हॉटेल, हॉस्पिटल, बांधकाम व विकास आणि उर्जा क्षेत्रात महत्त्वाचे कार्य करीत आहे.
राजकीय कारकिर्द
1976-1977 काळात मुंबईचे महापौर होते. शिवसेनेकडून 1990-1991मध्ये विधानपरिषदेवर वर्णी लागली. त्यानंतर 1995 मध्ये शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री झाले. शिवाजी पार्कवर भव्य शपथविधी पार पडला होता. 1999 ते 2002 केंद्रीय मंत्रिमंडळात मानव संसाधन विकास मंत्री म्हणूनही काम पाहिले. 2002 ते 2004 लोकसभेच्या अध्यक्षपदी वर्णी लागली. 2004 मध्ये लोकसभा निवडणुकीत 8 हजार मतांनी पराभव झाला होता.