TRENDING:

गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांना मोठा दिलासा, या तारखेपासून सुरू होणार फेरीबोट सेवा

Last Updated:

मान्सूनमध्ये समुद्र खूप जास्त खवळलेला असतो. समुद्रातील उंच लाटा आणि वादळी वाऱ्यामुळे प्रवासी बोटी बुडण्याच्या दुर्घटना घडू नये, यासाठी मान्सूनच्या आगमनाबरोबरच फेरीबोटीतून होणारी प्रवासी जलवाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय सरकारला घ्यावा लागतो.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
साक्षी पाटील, प्रतिनिधी
प्रवासी बोट
प्रवासी बोट
advertisement

मुंबई : मान्सूनमध्ये खवळणाऱ्या समुद्रामुळे २६ मेपासून बंद ठेवण्यात आलेल्या मांडवा मुंबईसह करंजा खाडीतील फेरीबोटीतून होणारी प्रवासी जलवाहतूक 1सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. या जलवाहतूक सेवेला पुन्हा सुरुवात झाल्यामुळे गौरी, गणपतीनिमित्ताने अलिबाग, मुरूड येथे आपल्या गावी जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर होणार आहे.

मान्सूनमध्ये समुद्र खूप जास्त खवळलेला असतो. समुद्रातील उंच लाटा आणि वादळी वाऱ्यामुळे प्रवासी बोटी बुडण्याच्या दुर्घटना घडू नये, यासाठी मान्सूनच्या आगमनाबरोबरच फेरीबोटीतून होणारी प्रवासी जलवाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय सरकारला घ्यावा लागतो. नारळी पौर्णिमेनंतर समुद्रातले वादळी वारे शांत होतात. त्यामुळेच चार महिन्यांच्या विश्रांतीनंतर प्रवासी वाहतूक पुन्हा एकदा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

advertisement

सर्वात जास्त रहदारी असणाऱ्या मांडवा ते मुंबई, रेवस ते भाऊचा धक्का या मार्गावर हजारो प्रवासी, पर्यटक दिवसाला प्रवास करीत असतात. सर्वसामान्य प्रवाशांना परवडेल, अशी ही फेरीबोटसेवा असल्याने रस्ते मार्गांचा प्रवास टाळत अनेक जण यातूनच प्रवास करतात.

पावसाळा आणि Viral Infection, अशी घ्या आपल्या आरोग्याची काळजी, महत्त्वाच्या टिप्स

यामुळे होते वाहतूक कोंडी पासून सुटका -

advertisement

दररोज दर अर्ध्या तासाने एक फेरीबोट मांडवा बंदरातून सुटते. गर्दीच्या वेळेला ही सरासरी वाढवली जाते. स्पीड बोट, रो-रोपेक्षा फेरीबोटीचा प्रवास सर्वसामान्यांना परवडणारा आहे. त्याचबरोबर रस्त्यावरील खड्डे, प्रदूषण, वाहतूक कोंडी यापासून सुटकारा म्हणून विशेषतः अलिबाग आणि मुरूड तालुक्यातील प्रवासी मुंबई-गोवा महामार्गावरून किंवा इतर मागनि मुंबईला जाण्यापेक्षा अलिबाग, मुरूडमधील प्रवासी फेरी बोटीचा वापर मोठ्या प्रमाणात करतात.

advertisement

ऐन सणासुदीच्या काळात वाढले गहू अन् बाजरीचे भाव, छत्रपती संभाजीनगरमध्ये असे आहेत दर..

पर्यटकांचा सर्वांत आवडता मार्ग -

1. प्रवासादरम्यान सीगल पक्ष्यांची संगत आणि जलवाहतुकीचा अनुभव लुटण्यासाठी मुंबईतील बहुतांश पर्यटक स्वस्तात मस्त असलेल्या या मार्गाची निवड करतात.

2. 1 सप्टेंबरपासून हा मार्ग खुला होत असल्याने अलिबाग, मुरूड, श्रीवर्धन तालुक्यातील पर्यटनाला भरारी येईल, अशी आशा येथील पर्यटक व्यावसायिकांना आहे.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांना मोठा दिलासा, या तारखेपासून सुरू होणार फेरीबोट सेवा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल