गणेशोत्सवाच्या काळात कोकण रेल्वेने कार ऑन ट्रेन सेवा सुरू केली होती, मात्र सुरुवातीला याला फार प्रतिसाद मिळाला नाही. केवळ कोलाड, नांदगाव रोड आणि वेर्णा येथून या सेवा सुरू होती, ज्यामुळे प्रवाशांना सोयीचा लाभ मिळत नव्हता. विशेषतहा रत्नागिरी आणि सावंतवाडी येथील प्रवाशांसाठी सेवा मर्यादित असल्याचे दिसून आले.
'या' स्थानकांचा असणार समावेश
advertisement
प्रशासनाने रो-रो सेवेत सुधारणा केली असून आता अतिरिक्त तीन स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे. कोकण रेल्वेचे अध्यक्ष संतोष कुमार झा यांनी सांगितले की, प्रवाशांना चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी सावंतवाडी, रत्नागिरी आणि संमगमेश्वर येथे रॅम्प तयार केले जातील. या सुधारणा केल्याने प्रवाशांचा अनुभव अधिक सुलभ आणि सुरक्षित होईल.
रो-रो सेवेची संरचना कशी आहे?
रो-रो ट्रेनमध्ये 10 डब्यांचे वॅगन असून दोन प्रवासी कोच आहेत. प्रत्येक ट्रिपमध्ये 40 कार्स घेऊन जाण्याची क्षमता आहे. कोलाड ते वेर्णा मार्गासाठी तिकीट दर 7,875 रुपये असून कोलाड ते नांदगाव मार्गासाठी 5,460 रुपये आहेत.
तिकीट शुल्क आणि बुकिंग
प्रति कार तिकीटाचे एकूण शुल्क 7,875 रुपये आहे, ज्यामध्ये 5% GST समाविष्ट आहे. बुकिंग करताना 4,000 रुपये आगाऊ भरणे आवश्यक असून उर्वरित रक्कम 3,875 रुपये प्रवासाच्या दिवशी स्टेशनवर भरावी लागेल. प्रत्येक ट्रिपसाठी 40 कार्सची क्षमता आहे. लक्षात घ्या, 16 कार्सची बुकिंग झाली कीच ट्रिप सुरू होईल, अन्यथा पैसे परत मिळतील.
आवश्यक कागदपत्रे कोणती?
1)आधार कार्ड (झेरॉक्स कॉपीसह)
2)पॅन कार्ड
3)कार नोंदणी प्रमाणपत्र
या सेवेमुळे प्रवाशांना मुंबईतून कोकणात जाण्यासाठी वेळ वाचेल आणि प्रवास अधिक आरामदायी बनेल. प्रशासनाच्या सुधारित योजना लक्षात घेऊन आता रो-रो सेवा अधिक स्थानकांवर उपलब्ध असून प्रवाशांना त्याचा फायदा घेता येईल.
