TRENDING:

मुंबईत माणदेशी महोत्सव, पारंपारिक घोंगडी बनते कशी? पाहा Video

Last Updated:

पुण्याच्या इंदापूर येथून आलेली गावतील मंडळी या ठिकाणी घोंगडी बनवण्याची प्रात्यक्षिक सादर करत आहे. त्यांची घोंगडी बनवण्याची कला पाहून मुंबईकर या ठिकाणी गर्दी करत आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
निकिता तिवारी 
advertisement

मुंबई : मुंबईमध्ये सध्या मानदेशी महोत्सव सुरू आहे. नरे पार्कमध्ये सुरू असलेल्या या महोत्सवामध्ये आपल्याला वेगवेगळ्या गावाकडच्या गोष्टी पाहायला मिळतात. पुण्याच्या इंदापूर येथून आलेली गावतील मंडळी या ठिकाणी घोंगडी बनवण्याची प्रात्यक्षिक सादर करत आहे. त्यांची घोंगडी बनवण्याची कला पाहून मुंबईकर या ठिकाणी गर्दी करत आहेत.

उत्कर्ष महिला बचत गट घोरपवाडी, इंदापूर, पुणे येथून हातमाग घोंगडी व जेन उद्योग बनवणारी मंडळी मुंबईतील माणदेशी महोत्सवात सामील झाली आहेत. या ठिकाणी ते पारंपारिक घोंगडी बनवण्याची प्रात्यक्षिक सर्वांसमोर सादर करत आहेत. एवढेच नव्हे ते घोंगडी कशी बनवतात याची प्रक्रिया देखील सांगत आहेत. सुरुवातीला घोंगडीसाठी लागणारा पारंपारिक तानाबाना धागा ते या ठिकाणी बनवत असून त्याच्यानंतर घोंगडीसाठी लागणाऱ्या साच्यात तो धागा अडकवून घोंगडीची पुढची प्रक्रिया करत आहेत.

advertisement

साखरपुड्यावरही पैसे उधळणाऱ्यांनो, हे पाहाच! शितलने लग्नाचे 3 लाख दिले मंगलकार्यालयाला, कारण...

या घोंगडीचा वापर म्हणजे कोणत्याही धार्मिक विधीसाठी या घोंगडी गावच्या ठिकाणी विशेषतः वापरतात. तसेच मणक्यासाठी देखील ही घोंगडी फायदेशीर आहे. जर कोणाला मणक्याचा आजार असेल तर या घोंगडीचा वापर केल्याने तो बरा होतो. याशिवाय योग्य रक्ताभिसरणासाठी ही घोंगडी फायदेशीर ठरते. योगासन करण्यासाठी ही घोंगडी वापरण्यात येते तसेच बैठकीसाठी देखील ही घोंगडी गावच्या ठिकाणी अधिक वापरली जाते.

advertisement

सर्वात महत्त्वाचे म्हणजे थंडीच्या दिवसांमध्ये गावांमध्ये मोठ्या प्रमाणात थंड वातावरण असते. तेव्हा थंडीपासून संरक्षण करण्यासाठी या घोंगडीचा वापर केला जातो. या घोंगडीमध्ये आपल्याला एक वॉटरप्रूफ घोंगडी देखील पाहायला मिळते. वॉटरप्रूफ घोंगडी ही पावसात विशेषता शेतातील काम करण्यासाठी किंवा खेड्यापाड्यातून ये जा करण्यासाठी वापरली जाते. डोक्यावर ही घोंगडी ओढल्यानंतर याच्यात पाणी येत नाही. एक प्रकारे रेनकोट सारखा वापर या घोंगडीचा केला जातो. या घोंगडीची किंमत फक्त बाराशे रुपये आहे.

advertisement

जगन्नाथ कुचेकर सांगतात की, मी जवळपास 25 वर्षे झाले हा व्यवसाय करत आहे. गावच्या ठिकाणी शेती उत्पन्नाला हवा तसा प्रतिसाद न लाभल्यामुळे आम्ही हा व्यवसाय देखील करत असतो. तसेच मुंबई व्यतिरिक्त आम्ही देशभरातील वेगवेगळ्या प्रदर्शनांमध्ये भाग घेतो. तिथे आम्ही आमची घोंगडी बनवण्याची कला सादर करत असतो. तसेच आम्ही अशा वेगवेगळ्या प्रदर्शनांमध्ये भाग घेऊन तिथे घोंगडी विकत असतो.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
मुंबईत माणदेशी महोत्सव, पारंपारिक घोंगडी बनते कशी? पाहा Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल