TRENDING:

Indian Oil Recruitment: ना परीक्षा, ना मुलाखत, थेट नोकरीची संधी; इंडियन ऑईलमध्ये मेगाभरती, कसा कराल अर्ज?

Last Updated:

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरूणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीमध्ये नोकरीच्या सुवर्णसंधी चालून आल्या आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरूणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) कंपनीमध्ये नोकरीच्या सुवर्णसंधी चालून आल्या आहेत. जे ग्रॅज्युएशन पास आणि बारावी पास असतील त्यांच्या दृष्टीने महत्त्वाची बातमी आहे. इंडियन ऑइलच्या पाईपलाइन विभागात शिकाऊ उमेदवारांच्या (Apprentice) एकूण 394 जागा भरल्या जाणार आहेत. तरूणांच्या दृष्टीने आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे, भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा किंवा मुलाखत घेतली जाणार नाही. अप्रेंटिसशिपसाठी उमेदवारांची निवड केवळ त्यांच्या शैक्षणिक गुणांच्या (Merit Basis) आधारेच त्यांची निवड केली जाणार आहे.
Indian Oil Recruitment: ना परीक्षा, ना मुलाखत, थेट नोकरीची संधी; इंडियन ऑईलमध्ये मेगाभरती, कसा कराल अर्ज?
Indian Oil Recruitment: ना परीक्षा, ना मुलाखत, थेट नोकरीची संधी; इंडियन ऑईलमध्ये मेगाभरती, कसा कराल अर्ज?
advertisement

अप्रेंटिसशिपच्या भरतीला 28 जानेवारीपासून सुरूवात होणार असून शेवटची तारीख 10 फेब्रुवारी 2026 आहे. 10 फेब्रुवारी 2026 रोजी तुम्ही मध्यरात्री 12 वाजेपर्यंत अर्ज भरू शकणार आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवार NAPS आणि NATS पोर्टलला भेट देऊन ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकतात. संपूर्ण देशामध्ये भरती प्रक्रिया पार पडली जाणार असून इंडियन ऑइलच्या पाईपलाइन विभागात असलेली 394 रिक्त जागांसाठी ही भरती देशातील प्रत्येक राज्यांतर्गत वेगवेगळी भरती केली जाणार आहे. दरम्यान, महाराष्ट्रामध्ये अहमदनगर, मनमाड आणि सोलापूर या तीन ठिकाणी एकूण 12 शिकाऊ उमेदवारांची भरती केली जाणार जाईल. या भरती प्रक्रियेत तांत्रिक आणि बिगर तांत्रिक अशा दोन्ही प्रकारच्या पदांचा समावेश आहे.

advertisement

विविध पदे आणि शैक्षणिक पात्रता

  • टेक्निशियन अप्रेंटिस (मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, टेलिकॉम आणि इन्स्ट्रुमेंटेशन): संबंधित इंजिनिअरिंग शाखेतील ३ वर्षांचा पूर्णवेळ डिप्लोमा.
  • ट्रेड अप्रेंटिस (Assistant HR): कोणत्याही विषयातील पूर्णवेळ पदवी (Graduation).
  • ट्रेड अप्रेंटिस (Accountant): वाणिज्य शाखेतील (B.Com) पदवी.
  • डेटा एन्ट्री ऑपरेटर (Fresher/ Skill Certificate): किमान 12वी उत्तीर्ण, परंतु पदवीधर नसावा.
  • advertisement

  • वरती नमुद केलेली सर्व शैक्षणिक पात्रता उमेदवारांनी 31 जानेवारी 2026 पर्यंत पूर्ण केलेली असणे अनिवार्य आहे.

IOCL Apprentice Recruitment 2026 Notification

IOCL Apprentice Recruitment 2026 Online Form Link

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीन आणि तुरीच्या दरात घसरण, कांद्याची कशी राहीली स्थिती? Video
सर्व पहा

अर्जदारांसाठी वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. अर्जदाराचे वय 31 जानेवारी 2026 रोजी किमान 18 वर्षे आणि कमाल 24 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. सरकारी नियमांनुसार, SC/ ST उमेदवारांना 5 वर्षे आणि तर OBC (NCL) उमेदवारांना 3 वर्षांची वयोमर्यादेत सवलत देण्यात आली आहे. उमेदवार NAPS आणि NATS या पोर्टलद्वारे वेगवेगळ्या ट्रेडसाठी अर्ज करू शकणार आहेत. जे इच्छुक उमेदवार असतील त्यांनी प्रथम ट्रेडनुसार NATS (https://nats.education.gov.in/) किंवा NAPS (https://www.apprenticeshipindia.gov.in) पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यानंतर इंडियन ऑइलच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन आपला अर्ज पूर्ण करावा. https://plapps.indianoilpipelines.in/ ही अधिकृत वेबसाइट आहे. निवड झालेल्या उमेदवारांना 12 महिन्यांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. या प्रशिक्षणादरम्यान नियमानुसार मासिक पगार म्हणजेच स्टायपेंड देखील दिले जाणार आहे.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
Indian Oil Recruitment: ना परीक्षा, ना मुलाखत, थेट नोकरीची संधी; इंडियन ऑईलमध्ये मेगाभरती, कसा कराल अर्ज?
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल