कोर्टात झालेल्या सुनावणीत जैन समाजाची बाजू मांडणाऱ्या वकिलांनी मुंबई महानगपालिका आणि महाराष्ट्र सरकारला टोला लगावला आहे.
जैन समाजासाठी पवित्र मानल्या जाणाऱ्या पर्युषण पर्वास मंगळवारपासून सुरूवात झाली आहे. या कालावधीत
मुंबईत कत्तलखाने बंद ठेवण्याची मागणी जैन समाजाच्यावतीने करण्यात आली आहे. याप्रकरणी, न्यायालयात दाखल याचिकेवर आज सुनावणी पार पडली. त्यामध्ये, पुढील दोन आठवड्यात महापालिकेलाआपले म्हणणे सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. दरम्यान आज झालेल्या युक्तिवादात जैन समाजाची बाजू मांडणाऱ्या वकिलांनी टोला लगावला आहे. मुघल सम्राट अकबराला देखील कत्तलखाने बंद करण्याबद्दल पटवणं सोप्प मात्र महाराष्ट्र सरकार आणि मुंबई महापालिकेला पटवणं कठीण असल्याचे वकिलांनी युक्तिवादात म्हटले आहे.
advertisement
नेमकं काय झालं सुनावणीत?
मुघल सम्राट अकबराला देखील कत्तलखाने बंद करण्याबद्दल पटवण सोप्प मात्र महाराष्ट्र सरकार आणि मुंबई महापालिकेला पटवणे कठीण असे म्हणत जैन समाजाच्या वकिलांचा मुंबई महापालिकेला टोला लगावला आहे. तसेच त्याकाळी मुघल सम्राट अकबराने कत्तलखाने बंद केला होता. मुंबईत 24 ऑगस्ट आणि 27 ऑगस्टला कत्तलखाने बंद आहेत. अहमदाबादपेक्षा मुंबईत जैन समाजाची समाज अधिक असल्याचं मुंबई महापालिकेने विचारात न घेतल्याची माहिती वकिलांनी कोर्टात दिली आहे.
मुंबईत जैन समाजाची समाज अधिक
अहमदाबाद येथे संख्या कमी असून देखील संपूर्ण पर्यूषण पर्वात कत्तलखाने बंद आहेत. जैन समाजाची लोकसंख्या अत्यल्प असल्याच्या पालिकेच्या भूमिकेवर जैन समाजाने आक्षेप घेतला. सध्या श्रावण महिना सुरू असून अर्ध्याहून अधिक मांसाहार करणारे मुंबईकर मांसाहार करत नसल्याचा दावा याचिकेत केला आहे.
मुंबई महानगपालिकेचा याचिकाकर्त्यांना सवाल
संपूर्ण पर्यूषण पर्व काळात कत्तलखाने बंद करण्याचा समाजाला वैधानिक अधिकार आहे का? संपूर्ण 10 दिवस कत्तलखाने बंद करण्याची मागणी कोणत्या अधिकारात अथवा कायद्यात बसते ? असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना केला आहे.