मुंबई : जर तुम्ही वर्किंग वुमन आहात किंवा कॉलेजला जात असाल तर तुमच्या नेहमीच्या वापरातील सर्वात महत्त्वाची वस्तू म्हणजे बॅग. मुंबईच्या धावपळीच्या गर्दीत चांगली बॅग असणे फार गरजेचे आहे. अशातच स्वस्तात आणि टिकाऊ चांगल्या हॅन्ड बॅग तुम्हाला कुठे मिळतील? असा प्रश्न अनेकांना नेहमीच पडतो. त्यामुळे बजेटमध्ये आणि चांगल्या दर्जाच्या हॅन्ड बॅग मिळणाऱ्या ठिकाणाबाबत आपण आज जाणून घेऊयात.
advertisement
मालाड स्टेशनला उतरल्यावर पश्चिमेकडे गेल्यावर, नटराज मार्केट दिसते. नटराज मार्केटमध्ये अनेक बॅगांचे स्टॉल दिसतात. इथे तुम्हाला दैनंदिन वापरासाठी वन साईडेड, स्लिंग बॅग, मोबाईल पाऊच, वॉलेट हे सर्व फक्त 100 रुपयांपासून मिळणार आहेत. जर तुम्ही छोटे वॉलेट खरेदी करायला गेलात तर ते तुम्हाला 100 रुपयाला मिळतील. वन साईड स्लिंग बॅगची किंमत 200 रुपयांपासून आहे, तर डेली यूजसाठी असणाऱ्या मोठ्या बॅगांची किंमत 500 रुपये आहे.
Ganeshotsav Pune : गणपतीसाठी सुंदर देखावे सेट घ्यायचेय तर पुण्यातील हे ठिकाण तुमच्या कामाचं, VIDEO
इथे तुम्हाला फॉर्म मटेरियल, प्लास्टिक मटेरियल, कापडी मटेरियल अशा विविध डिझाईनच्या रंगाच्या हव्या तशा आकाराच्या बॅग सहज मिळून जातील आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे इथे बार्गेनिंग करण्याची कोणतीही गरज नाही. कारण या बॅग्सची किंमत फक्त 200 रुपयांपासून सुरु होते. तसेच जर तुम्ही एखाद्या आउऊटडोरला जात असाल किंवा पार्टीसाठी फॅशनेबल स्लिंग बॅग शोधत आहात तर येथील बॅगची चॉईस परफेक्ट आहे.
निरलेक्सच्या तव्यावर कोकणी पद्धतीने बनवा झटपट घावणे, चव अशी की पुन्हा बनवाल, सोप्या रेसिपीचा VIDEO
वर्किंग वुमनसाठी मोठ्या आकाराच्या बॅगदेखील खूप छान दारात मिळून जातील. जर तुम्ही अजूनही मालाडच्या नटराज मार्केटला भेट दिली नसेल तर या बॅग घेण्यासाठी इथे नक्की भेट देऊ शकता. याठिकाणी तुम्हाला अनेक प्रकारच्या आणि स्वस्तात मस्त अशा वस्तू मिळतील.