मढ-वर्सोवा रस्त्यावर प्रवास करताना वाहनचालकांना अनेकदा तासन्तास वाहतुकीत अडकावे लागते. विशेषतहा ऑफिसच्या वेळा आणि सुट्ट्यांच्या दिवशी या मार्गावर मोठ्या प्रमाणात कोंडी होते. ही समस्या कायमस्वरूपी दूर करण्यासाठी खाडीवर पूल बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या पुलासाठी फेब्रुवारी 2023 मध्ये महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटीकडून मान्यता देण्यात आली होती. त्यानंतर नुकतीच कोस्टल रेग्युलेटरी झोन कडूनही अंतिम परवानगी मिळाली आहे. सर्व आवश्यक परवानग्या प्राप्त झाल्यानंतर महापालिकेने पुलाचा आराखडा अंतिम केला असून बांधकामासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. कंत्राटदाराची नियुक्तीही करण्यात आली असून लवकरच प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात होणार आहे. हा पूल सुरु झाल्यानंतर मढ-वर्सोवा परिसरातील प्रवाशांचा प्रवास अधिक जलद आणि सुकर होणार आहे.
advertisement
