लोकल तिकीट फसवणूक रोखण्यासाठी मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेने निर्णय घेतल. आता UTS on mobile या अॅपमधून QR कोड वापरून तिकीट बुकिंग बंद करण्यात आले आहे. यापुढे फक्त मोबाईलवर डिजिटल तिकीट म्हणजे पेपरलेस तिकीट किंवा स्टेशन किंवा पटरीपासून किमान 20 मीटर दूर गेल्यावरच बुक करता येईल.
QR कोडद्वारे बुकिंग बंद केलं असल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी दिली. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागानेही ट्विट करून हा बदल करण्यात आल्याचं प्रवाशांना सांगितलं. मध्य रेल्वेच्या उपनगरी भागात 20 मीटरच्या मर्यादेत QR कोड वापरून तिकीट घेण्याची सुविधा बंद आहे. त्यामुळे आता पेपरलेस तिकीट किंवा हार्ट तिकीट मिळणार आहे.
advertisement
2023 पासून प्रवाशांकडून या सिस्टीमचा गैरवापर होत असल्याच्या तक्रारी येत होत्या. काही वेबसाईटवर सर्व स्टेशनचे QR कोड उपलब्ध करून देण्यात आले होते. प्रवासी हे कोड डाउनलोड करून किंवा प्रिंट काढून ठेवत आणि नंतर गाडीत बसल्यावर लगेच तिकीट काढत. त्यामुळे टीसीलाही फसवता येत होतं. काही जणांकडे तर वेगवेगळ्या स्टेशनचे कोड छापून ठेवलेले असत.
UTS अॅपमध्ये सुरुवातीपासूनच GPS-आधारित सुरक्षा ठेवली होती. म्हणजे प्रवासी स्टेशनच्या हद्दीपासून किमान 20 मीटर दूर आणि बोर्डिंग स्टेशनपासून 2 किमीच्या आत असेल तेव्हाच तिकीट मिळणार. याशिवाय गॅलरीमध्ये सेव्ह केलेला QR कोड स्कॅन करता येऊ नये अशी अट होती. पण प्रवाशांनी दुसऱ्याच्या मोबाईल स्क्रीनवर दिसणारा कोड स्कॅन करूनही तिकीट काढल्याचे प्रकार समोर आलं. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने कठोर पावलं उचलून हा निर्णय घेतला आहे.