TRENDING:

Mahaparinirvan Din: ‘समतेचं सपान आता करूया साकार..’, शिवाजी पार्कवर पहिल्यांदाच रॅपमधून बाबासाहेबांना अभिवादन

Last Updated:

Mahaparinirvan Din: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वान दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी मुंबईतील चैत्यभूमी येथे लाखो अनुयायी जमले आहेत. इथं काही तरुणांनी रॅप संगीतातून अनोखी मानवंदना दिली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
साक्षी पाटील, प्रतिनिधी
advertisement

मुंबई: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज 6 डिसेंबरला महापरिनिर्वाण दिवस आहे. मुंबईतील चैत्यभूमीवर संपूर्ण देशभरातून लाखो भीम अनुयायी अभिवादन करण्यासाठी आले आहेत. चैत्यभूमीवर भीम अनुयायांचा मेळा जमला असून प्रत्येकजण आपआपल्या पद्धतीनं बाबासाहेबांना मानवंदना देतोय. काही तरुणांनी चक्क रॅपच्या माध्यमातून बाबासाहेबांना मानवंदान दिलीये. तसेच समतावादी चळवळीचे विचार या रॅप संगीताच्या माध्यमातून मांडले आहेत. याच तरुणांनी लोकल18 सोबत बोलताना आपल्या कलेबाबत माहिती दिलीये.

advertisement

पुण्यातील ‘बोल इन्कलाबी’ हा ग्रुप आज सकाळपासूनच भीम गीत आणि रॅप यांचे एकत्रीकरण करून छत्रपती शिवाजी महाराज पार्क इथे कार्यक्रम सादर करत आहे. 7 ते 8 तरुण-तरुणींचा हा ग्रुप नव्याने काहीतरी सर्वांसमोर आणत आहेत. भीम गीत आणि रॅप असा प्रयोग आजपर्यंत कधीच कोणी केला नव्हता. आजच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सगळे एकत्र येऊन लोकांचं मनोरंजन करत आहेत. उभे राहून केलेल्या सगळ्या रॅपना उपस्थितांचा खूप चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.

advertisement

Mahaparinirvan Din: भीमा घे पुन्हा, जन्म तू..., बाबासाहेबांना सांगीतिक मानवंदना, थेट चैत्यभूमीतून...

अगदी न मिळणाऱ्या नोकऱ्यांपासून ते गरिबी पर्यंत अशा सगळ्यांचा या रॅपमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. समाजात भेदभावाचे चटके सोसणाऱ्या दलित वर्गाचे प्रतिबिंब या रॅप मधून अधोरेखित करण्यात आलेले आहे. दादरच्या चैत्यभूमी परिसरात आजच्या दिवशी अनेक जण येतात. परंतु काहीतरी वेगळा मानस ठेवून समाजाचं प्रतिबिंब सर्वांसमोर आणण्याचं काम फार कमी जण करतात. तेच आम्ही बोल इन्कलाबीच्या माध्यमातून करत असल्याचं रॅपर सांगतात.

advertisement

आम्ही कचरा उचलणार नाही, पण....; 3500 अनुयायांची बाबासाहेबांना अनोखी मानवंदना, तुम्हीही कराल कौतुक

“आम्ही हे सगळे रॅप स्वतः लिहितो. रॅप म्हणजे अनेकांना यमक जुळवणं किंवा शिवीगाळ असंच वाटतं. परंतु खऱ्या अर्थानं रॅपचा जन्म अन्याय होत असणाऱ्या लोकांसाठी आवाज उठवण्याचं एक महत्त्वाचं साधन म्हणूनच झालेला आहे. त्यामुळे आम्ही सुद्धा रॅपच्या माध्यमातून भीम गीतांचा आणि त्यासोबतच नव्या विचारांचा प्रसार करत आहोत. आमच्या यूट्यूब चैनलच्या माध्यमातून सुद्धा आमचे हे कार्य सुरूच राहील,” असे रॅपर आणि गायक असणाऱ्या सागर धनराज यांनी सांगितले.

advertisement

रॅप आणि भीम गीते एकत्र करून नव्याने ही तरुण मंडळी समाजाप्रती काहीतरी करू पाहत आहेत. त्यांच्या रॅप मध्ये असणाऱ्या गाण्याच्या बोलांनी सामाजिक वास्तव मांडलंय. तसेच समाजात समतेचे जाणीव आणि बाबासाहेबांचे विचार पोहोचवण्याचं काम करत आहेत. त्यामुळे उपस्थित अनुयायांकडून या तरुणांवर कौतुकाचा वर्षाव होतोय.

मराठी बातम्या/मुंबई/
Mahaparinirvan Din: ‘समतेचं सपान आता करूया साकार..’, शिवाजी पार्कवर पहिल्यांदाच रॅपमधून बाबासाहेबांना अभिवादन
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल