आम्ही कचरा उचलणार नाही, पण....; 3500 अनुयायांची बाबासाहेबांना अनोखी मानवंदना, तुम्हीही कराल कौतुक
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Sakshi Sushil Patil
Last Updated:
Mahaparinirvan Din: डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी देशभरातील अनुयायी दादरच्या चैत्यभूमीवर दाखल झाले आहेत. साडेतीन हजार अनुयायांच्या एका संस्थेने अनोखी मानवंदना दिलीये.
साक्षी पाटील, प्रतिनिधी
मुंबई: भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा आज 6 डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिन आहे. बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून अनुयायी दादर येथील चैत्यभूमीवर आले आहेत. दादरचा चैत्यभूमी परिसर लाखो अनुयायांनी गजबजलेला आहे. या अनुयायांची गैरसोय होऊ नये म्हणून अनेक संस्था देखील कार्यरत आहेत. अशीच एक संस्था आणि तिचे 3500 कार्यकर्ते गेल्या 9 वर्षांपासून मोठं काम करत आहेत. याबाबत लोकल18 ने त्यांच्याशी संवाद साधला.
advertisement
दादरमधील ‘आम्ही आंबेडकरवादी’ ही संस्था गेले 9 वर्षांपासून कार्यरत आहे. या संस्थेचे राज्यभरातील 3500 हून अधिक कार्यकर्ते असून ते या काळात बाबासाहेबांना अनोखी मानवंदना देतात. ‘आमची भूमी, स्वच्छ भूमी, चैत्य भूमी’ या उपक्रमातून हे आंबेडकर अनुयायी कार्यरत आहेत. समुद्रकिनाऱ्यावरील कचरा त्यासोबतच शिवाजी पार्कमध्ये आजच्या दिवशी होणारा कचरा ते साफ करतात. तसेच चैत्यभूमीवर आलेल्या अनुयायांना परिसरात कचरा न करण्याचा संदेश देतात.
advertisement
बाबासाहेबांना अनोखी मानवंदना
दादरमधील चैत्यभूमीत अनेक जण बाबासाहेबांना आपापल्या परीने वेगवेगळ्या प्रकारे मानवंदना देत आहेत. आम्ही आंबेडकरवादी ही संस्था सुद्धा तरुणांना प्रोत्साहन देऊन या कार्यक्रमात सहभागी करून घेते. 2016-17 मध्ये हा उपक्रम सुरू झाला. तेव्हा केवळ 30 ते 40 जण एकत्र येऊन हा उपक्रम सुरू झाला. आता यात साडेतीन हजारांपर्यंत मुलं आणि कार्यकर्ते झाले आहेत. आम्ही कचरा उचलायला आलो नाही, तर कचरा होणार नाही याची दक्षता घेतोय, असं संघटनेच्या कार्यकर्त्यांनी लोकल18 सोबत बोलताना सांगितलं.
advertisement
आम्ही कचरा उचलणार नाही
'आमची संस्था गेली नऊ वर्ष कार्यरत आहे. आम्ही कचरा करणाऱ्यांना नेहमीच आवाहन करतो की तुम्ही कचरा करूच नका, काही फेकायचं असल्यास कचराकुंडीचा वापर करा. जेणेकरून साफसफाई करण्याची किंवा कचरा उचलण्याची वेळ कोणावर येणार नाही. प्रत्येकाने आपली जबाबदारी म्हणून आणि डॉक्टर बाबासाहेब यांना मानवंदना म्हणून अशा पद्धतीने आपली जबाबदारी ओळखली पाहिजे.' असे आम्ही आंबेडकरवादी या संस्थेचे शंकर जाधव यांनी सांगितले.
advertisement
दरम्यान, आमचा हा उपक्रम पुढील काळातही कायम सुरू राहणार आहे. ‘आमची भूमी, स्वच्छ भूमी, चैत्य भूमी’ हेच आमचे ब्रीद असून त्यात मोठ्या संख्येनं लहान मुलांपासून ज्येष्ठांचा सहभाग वाढत आहे, असेही त्यांनी सांगितले.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 06, 2024 1:32 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
आम्ही कचरा उचलणार नाही, पण....; 3500 अनुयायांची बाबासाहेबांना अनोखी मानवंदना, तुम्हीही कराल कौतुक