TRENDING:

Maharashtra Elections 2024: महायुतीमध्येही नाराजीनाट्य, उमेदवार यादीवरून शिंदे गट भाजपवर नाराज

Last Updated:

Maharashtra Assembly Elections 2024 : शिवसेनेला न विचारात घेता भाजपने जाहीर केलेल्या यादीबाबत कालच्या बैठकीत नाराजी व्यक्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
उदय जाधव, प्रतिनिधी, मुंबई : विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाने (भाजप) रविवारी, (20 ऑक्टोबर) आपल्या 99 उमेदवारांची यादी जाहीर केली. भाजपने या यादीत शिवसेनेच्या ताब्यात असणाऱ्या 5 जागांवरही उमेदवार जाहीर केले. मात्र, भाजपच्या या पवित्र्याने शिवसेना शिंदे गट नाराज झाला आहे. शिवसेनेला विचारात न घेता भाजपने जाहीर केलेल्या यादीबाबत कालच्या बैठकीत नाराजी व्यक्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्याशिवाय कल्याण पूर्वमधून गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आली. त्यावरही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली असल्याचे सूत्रांनी सांगितले.
महायुतीमध्येही नाराजीनाट्य, उमेदवार यादीवरून शिंदे गट भाजपवर नाराज
महायुतीमध्येही नाराजीनाट्य, उमेदवार यादीवरून शिंदे गट भाजपवर नाराज
advertisement

जागा वाटपावरून महाविकास आघाडीत वाद सुरू असल्याचे दिसून येत आहे. तर, दुसरीकडे महायुतीत सगळं काही आलबेल असल्याचा दावा केला जात होता. मात्र, महायुतीमध्येही नाराजीनाट्य सुरू असल्याचे म्हटले जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटाची बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटाच्या नेत्यांनी राज्यात सुरू असलेल्या घडामोडींवर मत व्यक्त केले.

advertisement

कल्याण पूर्वच्या उमेदवारीवर नाराजी....

कायदा हातात घेतलेल्या आमदारांच्या कुटुंबीयांना दिलेली उमेदवारी योग्य नसल्याचे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. ल्याण पूर्वमधून गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आली. आमदार गणपत गायकवाड यांनी वादातून शिंदे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर पोलीस ठाण्यात गोळीबार केला होता. सुलभा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर केल्याने महेश गायकवाड यांच्यासह कल्याणमधील पदाधिकाऱ्यांनी शिवसेना सोडण्याचा इशारा दिला आहे.

advertisement

बैठकीत एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना आयते मुद्दे मिळतील असे उमेदवार नको, असेही स्पष्ट केले. पक्षात इन कमिंग झालेल्या उमेदवारांच्या ऐवजी पक्षासाठी झटणाऱ्या स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्यात यावे असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

भाजपच्या यादीवर नाराजी...

भाजपने जाहीर केलेल्या धुळे, अंचलपुर, उरण, नालासोपारा, देवळी या मतदारसंघाच्या उमेदवारीवरून शिवसेनेत नाराजी असल्याचे सूत्रांनी सांगितले.

advertisement

शिवसेना आमदारांमध्ये चिंतेचे वातावरण...

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यानं डोकं लावलं, डाळिंबीच्या बागेत पैशाचं पीक, अर्ध्या एकरात 2 लाखांचं...
सर्व पहा

शिवसेनेच्या आमदारांची यादी अद्याप जाहिर न झाल्याने लवकरात लवकर यादी जाहीर करण्याची मागणी शिवसेना आमदारांनी केली. शिवसेनेच्या अनेक जागांवर भाजपचा डोळा असल्याने आमदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

मराठी बातम्या/मुंबई/
Maharashtra Elections 2024: महायुतीमध्येही नाराजीनाट्य, उमेदवार यादीवरून शिंदे गट भाजपवर नाराज
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल