TRENDING:

Maharashtra Elections 2024 : रणांगणात उतरले पण चक्रव्यूहमध्ये अडकणार? आदित्यचे दोन्ही भाऊ डेंजर झोनमध्ये!

Last Updated:

Maharashtra Assembly Elections 2024 : यंदा आदित्य ठाकरे आणि त्यांचे दोन भाऊ निवडणुकीच्या रणांगणात उतरले आहेत. मात्र हे दोन्ही भाऊ मैदान गाजवणार की विरोधकांच्या चक्रव्यूहमध्ये अडकणार हे निकालाच्या दिवशी समजणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई :  विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महायुती, महाविकास आघाडीशिवाय इतर पक्षांनी देखील आपले उमेदवार जाहीर केले आहेत. यंदाची निवडणूक चुरशीची होणार असल्याचा अंदाज आहे. काही ठिकाणच्या लढती या लक्षवेधी ठरणार आहेत. यंदा आदित्य ठाकरे आणि त्यांचे दोन भाऊ निवडणुकीच्या रणांगणात उतरले आहेत. मात्र हे दोन्ही भाऊ मैदान गाजवणार की विरोधकांच्या चक्रव्यूहमध्ये अडकणार हे निकालाच्या दिवशी समजणार आहे.
रणांगणात उतरले पण चक्रव्यूहमध्ये अडकणार? आदित्यचे दोन्ही भाऊ डेंजर झोनमध्ये!
रणांगणात उतरले पण चक्रव्यूहमध्ये अडकणार? आदित्यचे दोन्ही भाऊ डेंजर झोनमध्ये!
advertisement

आदित्य ठाकरे यांनी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत वरळी विधानसभेतून निवडणूक लढवली आणि विजयी झाले. त्यावेळी आदित्य ठाकरे यांच्यासाठी काही जमेच्या बाजू होत्या. त्यावेळी शिवसेना-भाजप सत्तेत होती. त्याशिवाय, स्थानिक पातळीवरील समीकरणे शिवसेनेने आपल्या बाजूने वळवली. स्थानिक मातब्बर नेते, माजी मंत्री सचिन अहिर यांना शिवसेनेत सामील करून घेतले होते. त्यामुळे आदित्य यांच्यासमोर फार मोठं आव्हान नव्हते. मात्र, यंदाच्या निवडणुकीत आदित्य ठाकरे यांचा चुलत भाऊ अमित ठाकरे आणि मावस भाऊ वरुण सरदेसाई निवडणुकीच्या रिंगणात आहेत. पहिल्यांदाच दोघेही निवडणूक लढवत असून त्यांच्यासमोर मोठी आव्हाने आहेत.

advertisement

अमित ठाकरे यांच्यासाठी कठीण पेपर...

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र आणि मनसे नेते अमित ठाकरे हे दादर-माहीम मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. अमित ठाकरे यांच्यासमोर शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार सदा सरवणकर आणि शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार महेश सावंत यांचे तगडे आव्हान आहे. दादर-माहीम या विधानसभा क्षेत्रात मनसेचा मतदार आहे. मात्र, पूर्वीप्रमाणे तो मनसेच्या पाठीशी कितपत उभा राहिल यावर प्रश्न आहे. तर, दुसरीकडे सदा सरवणकर यांनी शिवसैनिक, नगरसेवक ते आमदार असा प्रवास केल्याने त्यांना या मतदारसंघाची व्यवस्थित माहिती आहे. त्यांच्या परिचयातील हा मतदारसंघ असल्याने त्यांना यातील सकारात्मक गोष्टी आपल्याकडे वळवता येणे शक्य आहे. शिवसेना सोडून काँग्रेसमधून उभे राहिल्यानंतरही सदा सरवणकर यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती.

advertisement

शिवसेना ठाकरे गटाकडून महेश सावंत हे उमेदवार आहेत. शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिंदे गटात असलेल्या सदा सरवणकर यांच्याकडून मतदारसंघ आपल्याकडे खेचण्यासाठी महेश सावंत प्रयत्नशील असणार आहेत. महेश सावंत हे ठाकरे गटाचे विभागप्रमुख आहेत. प्रभादेवी-दादर-माहीम हा भाग शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. शिवसेनेतील फुटीनंतर आता ठाकरे गट हा मतदारसंघ जिंकण्यासाठी प्रयत्नशील असणार आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर अमित ठाकरे यांना विजय मिळवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे.

advertisement

माहीम मतदारसंघाचे 2019 चे निकाल

सदा सरवणकर- शिवसेना- 61,337 मतं

संदीप देशपांडे- मनसे- 42,690 मतं

प्रविण नाईक- काँग्रेस- 15,246 मतं

मातोश्रीच्या अंगणात विजयाचा गुलाल उधळणार?

आदित्य ठाकरे यांचे मावस भाऊ आणि युवा सेनेचे सरचिटणीस वरुण सरदेसाई हे पहिल्यांदाच निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. वरुण सरदेसाई यांना वांद्रे पूर्व भागातून ठाकरे गटाने उमेदवारी जाहीर केली आहे. मातोश्रीचा समावेश असलेला हा मतदारसंघ वरुण सरदेसाई यांच्यासाठी आव्हानात्मक आहे. सध्या वांद्रे पूर्वचे आमदार झिशान सिद्दिकी आहेत. झिशान हे काँग्रेसमध्ये असले तरी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात ते प्रवेश करण्याची शक्यता आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत झिशान सिद्दिकीने शिवसेनेचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचा 5,790 मतांनी पराभव केला होता. शिवसेनेतील बंडखोरीचा फटका बसल्याने महाडेश्वर यांचा पराभव झाला होता.

advertisement

वांद्रे पूर्व मतदारसंघात मराठी आणि बिगर-मराठी लोकवस्ती असलेला भाग आहे. या मतदारसंघात अल्पसंख्याक, अनुसूचित जातीच्या मतदारांचे प्रमाण लक्षणीय आहे. मराठी भाषिक मतदारांची संख्या लक्षणीय आहे.

2009 मध्ये झालेल्या मतदारसंघ पुनर्रचनेनंतर वांद्रे पूर्व मतदारसंघावर शिवसेनेचा वरचष्मा राहिला आहे. मात्र, मागील निवडणुकीत पराभवाचा धक्का बसल्याने ही निवडणूक सरदेसाईंसाठी सोप्पी नसणार. उद्धव ठाकरे यांचे विश्वासू आणि रणनीतिकार अॅड. अनिल परब यांच्यावर या मतदारसंघाची जबाबदारी आहे. त्यामुळे मतांचे गणित जमवून परब हे सरदेसाईंना निवडणुकीच्या रणांगणात कशी मदत करतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

तर, दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे संभाव्य उमेदवार असलेले झिशान सिद्दिकी यांनी मागील पाच वर्षात केलेले काम, महायुतीचा पाठिंबा या गोष्टी पथ्यावर पडू शकतात. सिद्दिकी यांनी या मतदारसंघात आपली छाप सोडली. मुस्लिम बहुल भागात त्यांचा चांगला प्रभाव आहे. त्यांचे वडील दिवंगत बाबा सिद्दिकी यांना मानणारा देखील एक वर्ग आहे. त्यामुळे एक सुप्त भावनिक लाटही सिद्दिकींसाठी फायदेशीर ठरू शकते. या भागात भाजपही आपले मतदान महायुती म्हणून सिद्दिकी यांच्याकडे वळवणार आहे. या सगळ्या समीकरणात वरुण सरदेसाई यांना हा मतदारसंघ जिंकण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.

2019 चा निकाल काय होता?

झिशान सिद्दिकी, काँग्रेस - 38,337

विश्वनाथ महाडेश्वर, शिवसेना - 32,547

तृप्ती सावंत, अपक्ष बंडखोर शिवसेना - 24,071

मोहम्मद कुरेशी, एमआयएम - 12,594

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यानं डोकं लावलं, डाळिंबीच्या बागेत पैशाचं पीक, अर्ध्या एकरात 2 लाखांचं...
सर्व पहा

अखिल चित्रे, मनसे- 10,683

मराठी बातम्या/मुंबई/
Maharashtra Elections 2024 : रणांगणात उतरले पण चक्रव्यूहमध्ये अडकणार? आदित्यचे दोन्ही भाऊ डेंजर झोनमध्ये!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल