राज्यात विधानसभेसाठी पुढीला महिन्यात मतदान होणार आहे. जवळपास महिनाभराचा कालावधी प्रचारासाठी उमेदवारांना मिळणार आहे. त्यामुळे जागा वाटप अद्याप जाहीर न झाल्याने इच्छुकांच्या पोटात गोळा आला आहे. तर, दुसरीकडे काहींनी आपल्या निवडणूक प्रचाराची सुरुवातही केली आहे. महाविकास आघाडीत काही जागांचा तिढा कायम आहे. त्याशिवाय, महाविकास आघाडीतील इतर लहान घटक पक्षांनी आपल्या पारंपरीक जागा सोडण्याची मागणी मविआकडे केली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आज शिवसेना ठाकरे गटाच्या आमदारांची बैठक पार पडणार आहे.
advertisement
अँजिओप्लास्टीनंतर उद्धव यांची पहिली बैठक
शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर काही दिवसांपूर्वीच अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया पार पडली होती. त्यानंतर काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर उद्धव आपल्या राजकीय कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत. आज होणारी आमदारांची बैठक हा त्यांच्या अँजिओप्लास्टीनंतरचा पहिला राजकीय कार्यक्रम आहे.
मविआची पहिली यादी लवकरच?
दरम्यान, विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे नेते विजय वड्डेवटीवार यांनी सांगितले की, 20 ऑक्टोबर रोजी पहिली यादी जाहीर होणार आहे. मविआत 216 जागांची चर्चा पूर्ण झाली आहे. तर उर्वरित 66 जागांवरही लवकरच चर्चा पूर्ण होणार आहे. विधानसभेच्या 288 जागांवर मित्रपक्षांबाबतही चर्चा सुरू असल्याने काही वेळ लागत असल्याचे त्यांनी सांगितले. आज अथवा उद्या पत्रकार परिषद घेण्यात येणार असल्याचे सूतोवाच त्यांनी केले.
