मुंबईसह मुंबई महानगर भागात मराठी भाषिकांसह हिंदी भाषिकांची संख्या लक्षणीय झाली आहे. अनेक विधानसभा मतदारसंघातील जय-पराजयाचं पारडं फिरवण्याइतपत हिंदी भाषिक मतदारांची संख्या झाली आहे. मुंबईतील 36 मतदारसंघातील काही ठिकाणी विजयी आमदार कोण असेल हे ठरवण्याइतपत मतदान गैरमराठी भाषिकांकडे असल्याचे सांगण्यात येते.
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मुंबईतील 36 जागांसाठी भाजपने कंबर कसली आहे. उत्तर प्रदेशातील काही नेते आणि आमदारांना मुंबईत तळ ठोकण्याचे आदेश पक्ष नेतृत्त्वाकडून देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. मुंबईतील उत्तर भारतीयांची संख्या अधिक असलेल्या भागात बैठका आणि सभा घेण्याचे निर्देश या उत्तर भारतातील नेत्यांना देण्यात आले आहेत. या नेत्यांना विधानसभा निवडणुकीपर्यंत मुंबईतच राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्रत्येक नेता, आमदाराकडे एका विधानसभेच्या जागेची जबाबदारी देण्यात आल्याची माहिती आहे.
advertisement
गोव्याच्या मंत्र्यांकडे कोकणची जबाबदारी...
दरम्यान, भाजपने गोव्याचे मंत्री आणि आमदार हे महाराष्ट्रातील कोकण भागातील प्रचारात सक्रिय राहणार आहेत. कोकणलगतच्या भागात हे मंत्री आमदार महायुतीचा प्रचार करणार आहेत. तर, गुजरातचे मुख्यमंत्री, आमदार आणि भाजपचे नेते हे गुजराती भाषिकांची सर्वाधिक संख्या असलेल्या भागात प्रचार करणार आहेत.
