कशी आहे पावसाची स्थिती?
30 नोव्हेंबर - कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर विदर्भात काठी ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. उद्या 1 डिसेंबर रोजीही अशीच परिस्थिती राहण्याचा भारतीय हवामान विभागाचा अंदाज आहे.
advertisement
बळीराजाची चिंता वाढली
पुढील 24 तास विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा अंदाज कायम असल्याने बळीराजाची चिंता वाढली आहे. पुढील 24 तास विदर्भातील अकोला, अमरावती, गोंदिया आणि नागपुरात विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आयएमडीने वर्तवली आहे. मध्य महाराष्ट्रातही दोन दिवस पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. पावसामुळे तापमानात घट होणार आहे. पुढील तीन दिवसात किमान तापमानात 2-3 अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे . काही ठिकाणी धुक्याची चादर पाहायला मिळणार आहे.
वाचा - '..म्हणून दुसरा पक्ष काढण्याची गरज वाटली नाही' शिबीरानंतर सुनिल तटकरेंचे मोठं विधान
22 जिल्ह्यांत तीन लाख 93 हजार 335 हेक्टरवरील पिकांचे नुकसान
राज्यात मागील आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे 22 जिल्ह्यांत तीन लाख 93 हजार 335 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अद्यापही नुकसानग्रस्त 10 हून अधिक जिल्ह्यांमधील पूर्ण आकडेवारी येणे बाकी असून साडेचार लाख हेक्टरहून अधिक शेतीवरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज मांडला गेला आहे. मागील आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसाने सहा जणांना मृत्यू झाला होता. तर 161 जनावरे दगावली होती.
