NCP Camp : '..म्हणून दुसरा पक्ष काढण्याची गरज वाटली नाही' शिबीरानंतर सुनिल तटकरेंचे मोठं विधान
- Published by:Rahul Punde
Last Updated:
NCP Camp : उपमुख्यमंत्री अजित पवार गटाच्या वतीने आज कर्जत येथे दोन दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आलं आहे.
मुंबई, 30 नोव्हेंबर (अजित मांढरे, प्रतिनिधी) : उपमुख्यमंत्री अजित पवार गटाच्या वतीने आज दोन दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आलं आहे. या शिबिराला उद्या 1 डिसेंबरला अजित पवार राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून मार्गदर्शन करणार आहेत. आजच्या या शिबिरामध्ये आमदार, माजी आमदार, खासदार, माजी खासदार आणि राज्यातले सर्व जिल्हाध्यक्षांना निमंत्रित करण्यात आलं होतं. आजच्या सत्रानंतर महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी पत्रकार परिषद घेत पक्षाची भूमिका स्पष्ट केली.
'घड्याळ तेच, वेळ नवीन'
सुनिल तटकरे म्हणाले, 'घड्याळ तेच, वेळ नवीन' हे नवीन घोषवाक्य घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन दिवसीय वैचारिक शिबीर आजपासून सुरू झाले आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वाच महायुतीत सहभागी झाल्यानंतर आज दोन दिवसीय शिबीर आज सुरू झाले. मान्यवरांनी आज आपले मार्गदर्शन केले. अजित पवार यांनी घेतलेला निर्णय धर्मनिरपेक्षात फारकत न करता कसा योग्य आहे, यावर आज मते व्यक्त झाले. निमंत्रित केलेले सर्वजण उपस्थित होते. विविध मुद्दयांवर आज चर्चा झाली.
advertisement
म्हणून आम्ही नवीन पक्ष काढला नाही : सुनिल तटकरे
निवडणूक आयोगात सुरू असलेली सुनावणी, अवकाळी पाऊस अशा विविध मुद्यांवर चर्चा झाली. उद्या शेवटचा दिवस अजित पवार यांच्या भाषणाने सांगता होईल. अजित पवार राष्ट्रीय अध्यक्ष निवडल्यानंतर आज पहिल्यांदाच राष्ट्रीय कार्यकारीणीची बैठक झाली. राष्ट्रीय पातळींवर पक्षाची स्थिती पुन्हा चांगली कशी करता येईल यावर चर्चा झाली. इस्त्रायल पॅलेस्टाईन अशा विविध विषयांमध्ये शांतता कशी प्रस्थापित करता येईल यावर चर्चा झाली. पक्षावरचे प्रचंड प्रमाणावरचे पाठबळ मिळाले म्हणून वेगळा पक्ष काढण्याची गरज वाटली नाही. डिसेंबर महिन्यानंतर महायुतीकडे सर्व पक्ष एकत्र बसणार आणि जागा वाटप आणि मजबुतीने निवडणुकीला सामोरे जावू. मोदींच्या नेतृत्वाखाली 1984 नंतर पहिल्यांदा एवढे मोठे यश मिळाले आहे. एक्झिट पोल काहीही असो निकाल येईल तेव्हा सर्व स्पष्ट होईल, अशी माहिती सुनिल तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
advertisement
राष्ट्रवादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित
view commentsसुनिल तटकरे म्हणाले, आगामी काळात येणार लोकसभेच्या निवडणुका, पक्ष, पक्षाचे संघटन मजबूत करण्यासंदर्भात चर्चा होणार आहे. वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती शिबिराला मार्गदर्शन करणार आहे, राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या समारोपीय भाषणाने शिबिराची सांगता होणार आहे. यावेळी राष्ट्रवादी युवकचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित असणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 30, 2023 9:00 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
NCP Camp : '..म्हणून दुसरा पक्ष काढण्याची गरज वाटली नाही' शिबीरानंतर सुनिल तटकरेंचे मोठं विधान


