मुंबई: महाराष्ट्रात सर्वत्र उष्णतेची लाट दिसून येत आहे. अशातच पुन्हा एकदा अवकाळी सावट राज्यावर घोंघावत आहे. पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भ आणि मराठवाड्यातील काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. प्रचंड उकाडा, तीव्र उष्णता आणि वादळी वाऱ्यासह अवकाळीचा तडाखा अशा तिहेरी संकटांचा सामना नागरिकांना करावा लागतोय. 21 एप्रिल रोजी राज्यातील हवामानाची स्थिती काय राहील? याबाबत जाणून घेऊ.
advertisement
मुंबईकरांना तापमानाचा दिलासा
राजधानी मुंबईत गेल्या काही दिवासंत उष्णतेची लाट निर्माण झाली होती. परंतु, आता नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळत आहे. 20 एप्रिला रोजी मुंबई किमान 26 तर कमाल 35 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. यात 21 एप्रिल रोजी एका अंशाची घट होणार आहे. तर 25 एप्रिलपर्यंत उष्णतेचा पारा 32 अंशांपर्यंत खाली येण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
पाण्याअभावी गाव सोडून जाण्याची वेळ, पुण्यातील या गावांवर जलसंकट, Video
पश्चिम महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा अंदाज
पश्चिम महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये उन्हाची तीव्रता वाढली आहे. बहुतांश ठिकाणी पारा 40 अंशांच्या पार आहे. मात्र, 20 एप्रिल रोजी सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा आणि पुण्यातील काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. 21 एप्रिल रोजी देखील वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर तापमान मात्र 40 अंशांच्या दरम्यानच राहील. 20 एप्रिलला पुण्यातील किमान तापमान 24 तर कमाल 39 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. तर कोल्हापुरात किमान 22 आणि कमाल 38 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
मराठवाड्यात तापमानात 2 अंशांची घट
मराठवाड्यातील वातावरणातही मोठे बदल जाणवत आहेत. उष्णतेचा पारा 42 पार गेला असून नागरिक हैराण आहेत. 20 एप्रिलला छत्रपती संभाजीनगरमध्ये तापमानात काहीशी घट होऊन ते 41 अंशांवर राहिले. तर 21 एप्रिलला पुन्हा दोन अंशांची घट होऊन ते 39 अंशांवर येण्याची शक्यता आहे. तर मराठवाड्यातील विविध ठिकाणी अवाकाळी पावसाचा इशाराही देण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिकमध्येही पारा 40 च्या घरात राहणार असून अवकाळी पावसाचा अंदाज आहे.
उन्हाळ्यात राहा ठंडा ठंडा, कूल कूल! पूर्वी घरोघरी आढळणारी ही वनस्पती माहितीये का?
विदर्भात पारा 43 अंशांवर
विदर्भात अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली होती. आता उष्णतेची लाट निर्माण झाल्याची स्थिती आहे. 20 एप्रिलला नागपुरात 42 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. 21 एप्रिल रोजी यात पुन्हा एका अंशाने वाढ होणार आहे. तसेच वादळी वाऱ्यासह अवकाली पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
दरम्यान, राज्यातील हवामानाची स्थिती पाहता नागरिकांना योग्य ती काळजी घ्यावी लागणार आहे. उष्णतेपासून बचावासाठी दुपारच्या वेळी बाहेर पडणे टाळावे लागेल. तर वादळी वारा आणि अवकाळी पाऊस आल्यास सुरक्षित आश्रयस्थळी थांबणे गरजेचे आहे.