महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेच्या कार्यालयात सहाय्यक संचालक पदासाठी नोकर भरती केली जात आहे. नेमक्या किती पदासाठी ही भरती होणार आहे, याबद्दलची माहिती कळू शकलेली नाही. रिक्त पदे करार पद्धतीने (Contract Base) भरण्यासाठी इच्छूक उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. 26 सप्टेंबर रोजी ही नोकरभरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेची वेबसाइट www.mahasacs.org वर याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.
advertisement
इच्छुक आणि पात्र उमेदवारांना आपला अर्ज "प्रकल्प संचालक, महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, अॅक्वर्थ कृष्ठरोग आवार, वडाळा उड्डाण पुलाजवळ, आर. ए. किडवाई रस्ता, वडाळा (प), मुंबई- ४००००३१" या पत्त्यावर पाठवायचा आहे. ऑफलाइन माध्यमातून आलेले अर्जच स्वीकारले जाणार आहेत. विहीत नमुन्यात नसलेले तसेच मुदतीनंतर किंवा ई-मेलव्दारा प्राप्त होणारे अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत याची उमेदवारांनी नोंद घ्या. जाहिरातीमध्ये पगाराबद्दलची माहिती देण्यात आलेली नाही.