TRENDING:

Mumbai BJP : विधानसभेच्या तोंडावर भाजप मुंबईत भाकरी फिरवणार! 'त्या' नेत्यांचा पत्ता कट होण्याची शक्यता

Last Updated:

Mumbai BJP : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई भाजपमध्ये मोठे फेरबदल होणार आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : लोकसभा निवडणुकीत भाजपची राज्यातील कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली. राज्यात भाजपला एकूण 14 जागांवर थेट फटका बसला. परिणामी आगामी विधानसभा निवडणुकीआधी भाजपने भाकरी फिरवण्याचा निर्णय घेतला आहे. विशेषकरुन मुंबई भाजपमध्ये मोठे फेरबदल होणार असल्याची सुत्रांची माहिती आहे.
News18
News18
advertisement

वाचा - 'बहिणीचं नातं भावाला कळलंच नाही', रक्षाबंधनाआधी सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
Krushi Market: मक्याचे दर भुईसपाट! कांदा, सोयाबिनला रविवारी किती मिळाला भाव?
सर्व पहा

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुंबई भाजपमध्ये मोठे बदल होणार आहेत. जिल्हाध्यक्षांसह काही प्रमुख पदाधिकारी बदलणार आहेत. काही जिल्हाध्यक्षांची कामगिरी समाधानकारक नाही तर काहींना बढती देण्यात येणार असल्यामुळे मुंबई भाजपमध्ये हे बदल होणार असल्याची माहिती आहे. जिल्हाध्यक्षपदी काही तरुणांना संधी देणार असल्याचेही समजत आहे. येत्या आठवड्याभरात मुंबई भाजपमध्ये एक फेरबदल होणार असल्याची विश्वसनीय सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला माहिती दिली आहे.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai BJP : विधानसभेच्या तोंडावर भाजप मुंबईत भाकरी फिरवणार! 'त्या' नेत्यांचा पत्ता कट होण्याची शक्यता
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल