Supriya Sule on Ladki bahin Scheme | 'बहिणीचं नातं भावाला कळलंच नाही', रक्षाबंधनाआधी सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
Supriya Sule on Ladki bahin Scheme Speech | सुप्रिया सुळे यांनी बहिणीचं नातं भावाला कळलं नाही असं म्हणत खंत व्यक्त केली आहे. यासोबतच त्यांनी इशारा देखील दिला आहे.
मुंबई : मागच्या तीन चार दिवसांपासून सुप्रिया सुळे विरुद्ध अजित पवार असं राज्यात लाडकी बहीण योजनेवरुन टीकास्त्र सुरू झाल्याचं संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलं आहे. लाडकी बहीण योजनेवरुन विरोधपक्षानं सरकारला घेरलं आहे. तर सुप्रिया सुळे यांनी बहिणीचं नातं भावाला कळलं नाही असं म्हणत खंत व्यक्त केली आहे. यासोबतच त्यांनी इशारा देखील दिला आहे.
काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
आम्ही जे सगळे निवडणून आलो त्यात सगळ्या पक्षांचं मोठं योगदान आहे. वर्षा गायकवाड या खासदार म्हणून निवडून आल्या आहेत. सगळ्यात मोठा आवाज हा महाविकास आघाडीकडून वर्षा गायकवाड यांचा असतो. ती महाविकास आघाडीसाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे. पत्रकार मला जेव्हा विचारतात दिल्ली कशी आहे. तेव्हा मी उत्तर देते दिल्लीमधील हवा आता बदलली आहे. दिल्लीतलं वातावरण खूप बदलेलं आहे. आता महाराष्ट्रातलं वातावरण आपल्याला बदलायचं आहे. ही आपली खूप मोठी जबाबदारी आहे.
advertisement
विश्वास दाखवल्याबद्दल मानले उद्धव ठाकरेंचं आभार
लवकरात लवकर तिकीटाबाबत घोषणा करा, यात्रांना अपेक्षेपेक्षा जास्त रिस्पॉन्स येत आहे. सगळ्यांना अजून जोमानं काम करायचं आहे. माझ्यावर अधिक प्रेम असल्याने माझ्यावर जनतेचं अधिक प्रेम आहे. त्यामुळे माझी जागा निवडून येणार की नाही याकडे महाराष्ट्राचं विशेष लक्ष होतं. विधानसभेत जास्तीत जास्त आमदार आम्ही निवडून आणू असं आश्वासन सुप्रिया सुळे यांनी उद्धव ठाकरे आणि काँग्रेस पक्षाला दिलं आहे.
advertisement
लाडकी बहीणवरुन घणाघात
लोकसभेपर्यंत कुणालाच त्यांची बहीण आठवली नाही. जसा निकाल लागला, तशा बहिणी आठवायला लागल्या. दुर्देव असं की बहिणीचं नातं हे आमच्या भावांना कळलंच नाही, त्यांनी प्रेम आणि व्यवसायात गल्लत करायला लागली. प्रेमात व्यवसाय आणि पैसे नसतात. आणि व्यवसायात प्रेम नसतं, तिथे प्रेम करायला गेलात तर घाटे का धंदा होईल. जर प्रेमात पैसे आले तर त्याला नातं म्हणतच नाहीत.
advertisement
या सरकारचं दुर्देवं आहे की त्यांना प्रेम आणि व्यवसायातलं अंतरच कळत नाही. बोलताना म्हणतात, एक बहीण तर हरकत नाही दुसऱ्या आणू. पंधराशे रुपयाला या राज्यातलं नातं बिकाऊ नाहीय. आमच्या नात्याचा अपमान आहे. निरागस असणारं जे बहीण भावाचं प्रेम असतं त्याला किंमत लावायचं पाप या महाराष्ट्राच्या सरकारनं केलंय.
advertisement
दोन वीर बंधू त्यांच्या भाषणात असं म्हणाले, आमचं लक्ष आहे कुठली बहीण कुठे मतदान करते. एक जण नाही दोघं म्हणाले, कधीतरी पोटातलं ओठात येतंच आणि सत्य कधी लपवता येत नाही. काळजी करू नका आमचं लक्ष आहे तुमच्यावर पंधराशे नाही तीन नाही आज दहा हजारसुद्धा सहज देतील, पण ऑक्टोबरच्या निवडणुकीनंतर मी तुमचाच भाऊ आहे जसे दहा हजार दिले तशी परत घ्यायचीही ताकद माझ्यामध्ये आहे. दुसरा म्हणतो की मी लिस्ट रिव्ह्यू होणार आहे बहिणींची, म्हणजे आधी नातं जोडलं, नंतर मतदान करणार आणि मग पुन्हा चेक करणार नातं आहे की नाही. म्हणजे यांचं कुठलंही नातं प्रेमाचं नाहीच आहे. ते फक्त मताशी जोडलेलं आहे. डिसेंबरमध्ये आम्ही बघणार कुठल्या बुथवर किती मत पडली आणि त्यानुसार पुढचे पैसे आम्ही देणार, सगळ्या नाही तुम्ही एकाच भगिनीचे पैसे परत घेऊन बघा काय करायचे ते.... असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आणि इशाराही दिला आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 16, 2024 1:17 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Supriya Sule on Ladki bahin Scheme | 'बहिणीचं नातं भावाला कळलंच नाही', रक्षाबंधनाआधी सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?


