Tata ने आली मिनी 'Defender', धाकड फिचर्स आणि किंमत सगळ्यात कमी, खास PHOTOS
- Published by:Sachin S
Last Updated:
टाटाने मध्यमवर्गीय कुटुंबीय आणि मिड साईज एसयूव्ही सेगमेंटला टार्गेटकरून ही एसयूव्ही आणली आहे. यात एकूण ७ व्हेरियंट आहे, पण सगळ्यात जास्त चर्चा आहे ती मिनी डिफेन्डर समजली जाणाऱ्या Tata Sierra ROQ ची.
गेल्या अनेक वर्षांपासून बहुप्रतिक्षेत असलेली Tata Sierra अखेरीस लाँच करण्यात आली आहे. टाटा मोटर्सने तब्बल दोन ३ दशकानंतर आपल्या या लाडक्या Tata Sierra चं कमबॅक केलं आहे. पण, यावेळी टाटाने मध्यमवर्गीय कुटुंबीय आणि मिड साईज एसयूव्ही सेगमेंटला टार्गेटकरून ही एसयूव्ही आणली आहे. यात एकूण ७ व्हेरियंट आहे, पण सगळ्यात जास्त चर्चा आहे ती मिनी डिफेन्डर समजली जाणाऱ्या Tata Sierra ROQ ची.
advertisement
टाटा मोटर्सने दोनच दिवसांपूर्वी Tata Sierra लाँच केली. यासोबत काही व्हेरियंटही लाँच केले आहे. यामध्ये Tata Sierra ROQ Edition हे एक वेगळं मॉडेल आहे. यामध्ये खास अशी अॅक्सेसरी पॅक दिला आहे. त्यामुळे जो सियाराला दमदार आणि धाकड असा ऑफ-रोड लूक देतो. या अॅक्सेसरीमुळे Tata Sierra ROQ ही एसयूव्ही 'मिनी डिफेंडर' सारखी दिसते.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
Tata Sierra 2025 मध्ये दोन नवीन इंजिनचा समावेश केला आहे. यामध्ये एक 1.5-लीटर हायपरियन T-GDi टर्बो-पेट्रोल इंजिन दिलं आहे, जे ऑटोमॅटिक टॉर्क कनव्हर्टरसह येतोय. तर दुसरं इंजिन हे 1.5-लिटर रेवोट्रॉन नॅचुरली एस्पिरेटेड पेट्रोल मोटर इंजिन आहे, जे म्यॅनुअल आणि DCA (डुअल क्लच ऑटोमॅटिक) दोन पर्याय दिले आहे. या शिवाय 1.5-लिटर क्रायोजेट डिझेल इंजिनचा सुद्धा पर्याय दिला आहे पण अजून तो लाँच केला नाही.
advertisement


