MISS You Jemimah, स्मृतीच्या लग्नात डान्स करणारी श्रेयांका पाटील का झाली इमोशनल?

Last Updated:

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूची अष्टपैलू खेळाडू श्रेयांका पाटीलने इंस्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.या पोस्टमध्ये तिने जेमीमा मिस यू असे म्हटले आहे.

shreyanka patil
shreyanka patil
WPL 2026 Auction : वुमेन्स प्रिमियर लीग 2026चा मेगा लिलाव आज पार पडला आहे. या लिलावात अनेक संघांनी पर्समध्ये असलेल्या रक्कमेनुसार आपआपल्या ताफ्यात खेळाडू घेतले आहे. या दरम्यान रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूची अष्टपैलू खेळाडू श्रेयांका पाटीलने इंस्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.या पोस्टमध्ये तिने जेमीमा मिस यू असे म्हटले आहे.पण नेमकं श्रेयांकाने असं तिला का म्हटलं आहे? हे जाणून घेऊयात.
आरसीबीची स्टार खेळाडू श्रेयांका पाटीलने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत जेमिमा रॉड्रिग्ज,स्मृती मानधना, राधा यादव आणि अरुंधती रेड्डी यांच्यासोबत स्वतःचा एक फोटो शेअर करत पाटीलने कॅप्शन दिली आहे, "आम्हाला तुझी आठवण येईल जेमू."त्यामुळे जेमी आरसीबीत नसल्याने तिचे सहकारी खेळाडू तिची आठवण काढत आहे.
advertisement
खरं तर श्रेयांका पाटील आणि कर्णधार स्मृती मानधना यांना आरसीबीने आधीच कायम ठेवले होते, तर फ्रँचायझीने लिलावादरम्यान राधा यादव आणि अरुंधती रेड्डी यांना संघात आणून आपला संघ आणखी मजबूत केला. पण आरसीबीच्या ताफ्यात जेमिमा रॉड्रिग्ज नसल्याने श्रेयांका पाटीलने तिच्यासाठी भावनिक पोस्ट लिहली आहे.
जेमिमा रॉड्रिग्ज दिल्ली कॅपिटल्ससाठी एक महत्त्वाची खेळाडू आहे. दिल्लीने तिला या हंगामासाठी रिटेने केले होते. त्यामुळे तिला मेगा लिलावात उतरता आले नाही.त्यामुळेच इतर संघाना तिला आपल्या ताफ्यात घेता आले नाही. दरम्यान जेमी रॉड्रीग्जने वुमेन्स वर्ल्ड कपमध्ये उत्कृष्ट खेळी केली होती.या खेळीच्या बळावर दिल्ली कॅपिटल्सने तिला रिटेने केले होते.
advertisement
WPL चे वेळापत्रक
वुमेन्स प्रिमियर लीग 2026च्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये वुमेन्स प्रिमियर लीगचा पहिला सामना हा 9 जानेवारी 2026 ला नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. तर 5 तारखेला वडोदरा येथे फायनल खेळवला जाणार आहे.
यावेळी वेळापत्रकात मोठा बदल झाला आहे. साधारणपणे फेब्रुवारी-मार्च कालावधीत होणारा WPL, ७ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या पुरुषांच्या T20 विश्वचषकामुळे एक महिना आधीच हलवण्यात आला आहे. संघर्ष टाळण्यासाठी आणि खेळाडूंना पुरेसा तयारीचा वेळ देण्यासाठी, WPL जानेवारीच्या विंडोमध्ये हलवण्यात आला आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
MISS You Jemimah, स्मृतीच्या लग्नात डान्स करणारी श्रेयांका पाटील का झाली इमोशनल?
Next Article
advertisement
Gold Price : कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सपर्टने सांगितलं खरं कारण...
कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप
  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

View All
advertisement