Pune News : अंधारातून जाताना मोबाईलवर गाणी वाजवा..,बिबट्यापासून वाचण्यासाठी वनविभागाचा आदेश
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
सध्या संपूर्ण महाराष्ट्रभर बिबट्याची दहशत आहे. अशा परिस्थितीत बिबट्यापासून वाचवण्यासाठी वनविभागाने नागरीकांसाठी काही आदेश जारी केले आहेत. या आदेशात नेमकं काय आहे? हे जाणून घेऊयात.
Pune News : राज्यातील अनेक जिल्ह्यात सध्या बिबट्याने हाहाकार माजवला आहे. जिथे पाहाव तिकडे मानवी वस्तीत बिबट्यांचा मुक्तसंचार दिसून येतो आहे. काही ठिकाणी तर लहानग्या पोरांवर बिबट्याने हल्ला केल्याच्याही घटना घडल्या आहेत. पण सुदैवाने या घटनेत लहान मुलं वाचली आहेत पण त्यांना इजा मात्र गंभीर झाल्या आहेत. या घटनेने सध्या संपूर्ण महाराष्ट्रभर बिबट्याची दहशत आहे. अशा परिस्थितीत बिबट्यापासून वाचवण्यासाठी वनविभागाने नागरीकांसाठी काही आदेश जारी केले आहेत. या आदेशात नेमकं काय आहे? हे जाणून घेऊयात.
पुणे शहरातील औंध परिसरात बिबट्याचा वावर आढळून आला आहे. वनविभागाचे अधिकारी/कर्मचारी व रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्टचे टीम हे अत्यल्पपणे थर्मल ड्रोन, ट्रॅप कॅमेरे, झूम स्कोप यांच्या मदतीने तसेच पथकांनी बरीच विविध भागात बिबट्याचा शोध घेत आहेत.तसेच या पार्श्वभूमीवर वनविभागामार्फत पुणे शहरातील विशेषतः टेकडी परिसर व इतर मोठ्या प्रमाणात संरक्षित प्रदेशात झाडोरा असणाऱ्या नागरिकांना वनविभागामार्फत सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
advertisement
नागरीकांना सतर्कतेच्या सूचना
पुणे शहरातील असणाऱ्या शाळकऱ्यांनी रात्री शेतात पाणी देण्यासाठी जाताना समूहाने जावे. हातात काठी घेऊन, गळा वाजणे (शिटी)/शक्य असल्यास बांबू, मोबाईलवर गाणी वाजवावी.
उड्ड्या जागेवर शौचास जाऊ नये.
शाळा वनक्षेत्रालगत असल्यास लहान मुलांनी समूहाने जावे किंवा पालकांनी सोबत असल्यास खबरदारी घेणे उचित ठरेल.
बिबट्या तसेच इतर वन्यप्राण्यांच्या बाबतीत चुकीच्या बातम्या, बनावट छायाचित्र व व्हिडिओ प्रसारू नये. अपुष्ट व्हिडिओ/छायाचित्र सोशल मीडियावर फॉरवर्ड करू नये.
advertisement
रात्रीच्या वेळेस दरवाजे व्यवस्थितपणे लॉक लावून बंद करा. रात्री उगाचच अंगणात किंवा घराच्या बाहेर उघड्यावर झोपणे टाळावे.
रात्रीच्या वेळेस तसेच संध्याकाळी पहाटे लहान मुलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना बाहेर एकटे सोडू नका. बिबट्या रात्रीचा अति सक्रिय असतो.
बिबट्याचा वावर असलेल्या क्षेत्रातील लोकांनी आपल्या पाळीव जनावरं राजहक्क जवळील बंदिस्त गोठ्यामध्ये बांधावी, जेणेकरून ते सुरक्षित राहतील. गोठ्याला भरपूर प्रकाश लावावा.
advertisement
कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करा. अन्नकचऱ्यामुळे कुत्र्यांची व डुकरांची संख्या वाढते आणि बिबट्या त्यांच्याकडे आकर्षित होतो.
पाळीव कुत्रे, शेळ्या, मेंढ्या इ. रात्री मोकळे सोडू नका, त्यांना सुरक्षित बंदिस्त जागी ठेवा.
राजहक्क किंवा साखरपाटी परिसरात मांसाचा कचरा, उरलेले मांस, हाडे, कत्तलखान्याचा कचरा उघड्यावर टाकू नये. यामुळे बिबट अशा भागात आकर्षित होऊ शकतो.
advertisement
एकटे दुर्गम जागी जाणे टाळा.
दाट झाडे, झुडपी भाग, नाले, ओढे, रिकामे प्लॉट, बांधकाम साइट्स यामधून एकट्याने जाऊ नये (विशेषतः रात्रीच्या वेळी, शक्यतो टाळावे.)
रात्री घराबाहेरील प्रकाश व्यवस्था नीट ठेवा.
पहाटे/संध्याकाळी चालत असताना टॉर्चचा वापर करा. हातात घासायची काठी ठेवा. मोबाईलवर गाणी वाजवा.
स्मशानभूमी, शाळा परिसर, सार्वजनिक उद्यान, झाडोरा/रिकाम्या प्लॉटच्या कडेला पुरेशी लाईटची व्यवस्था ठेवावी. शक्य असल्यास सीसीटीव्ही कॅमेरे नीट कार्यरत ठेवावेत.
advertisement
झाडाला/झुडपी लपून बसू नका. त्यामुळे बिबट्या तुम्हाला लहान प्राणी समजून तुमच्यावर हल्ला करण्याची शक्यता वाढते.
बिबट्या दिसला तर काय करावयाचे...?
अजिबात घाबरू नका. उभे रहा, पळू नका, पाठ फिरू नका. तुम्ही किंचितही कोणते पळाला तरीही बिबट्याची जास्त कोणाने चवर शिकारण नाहीत. पळणाऱ्या शिकारीचा पाठलाग करणे हा त्याचा नैसर्गिक स्वभाव असल्याने तो हल्ला करण्याची शक्यता वाढते.
advertisement
बिबट्या जवळ असल्यास ओरडत हातवारे मागे सरका. बिबट्या दूर असल्यास शांतपणे हात वर करून मागे हटा.
तुमचे दोन्ही हात वर उचला आणि जोरजोरात ओरडा. असे केल्याने, बिबट्याला तुम्ही त्याच्यापेक्षा मोठे प्राणी असल्याचा भास होतो.
डोळ्यात डोळे न पाहता हळू आवाजात बोला किंवा आवाज करून मानवी उपस्थिती दाखवा.
प्राण्याला कोणत्याच मार्ग जाऊ नका; त्याला पळून जाण्यासाठी मोकळा रस्ता राहू द्या.
मानव – वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी प्रत्येक नागरिकाने जबाबदार वर्तन ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आपल्यास छोट्या सहकार्यामुळे बिबट्यास सुरक्षितपणे जंगलात पाठवणे आणि नागरिकांचेही संरक्षण करणे शक्य होईल.बिबट्या पकडण्याचे मोहिमेदरम्यान वन विभाग, पोलीस किंवा स्थानिक प्रशासन ज्या सूचना देतील, त्या सर्वांनी सहकार्याने पाळाव्यात. आवश्यक असेल तर त्या भागात काही वेळ फेऱ्या बंद केली जाऊ शकते; त्या निर्णयाला पाठिंबा द्यावा.
त्वरित अशा प्रकारच्या कोणतीही माहिती मिळाल्यास १९२६ या क्रमांकावर संपर्क करून त्याबाबतची माहिती वनविभागास देण्यात यावी.या सूचनांचे पालन करून नागरिकांनी आपली आणि पाळीव प्राण्यांची सुरक्षा सुनिश्चित करावी, असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी भामबुर्डा (पुणे) यांनी केले आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
November 27, 2025 11:50 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Pune News : अंधारातून जाताना मोबाईलवर गाणी वाजवा..,बिबट्यापासून वाचण्यासाठी वनविभागाचा आदेश


