Supriya Sule: अजितदादांना राखी बांधणार का? सुप्रिया सुळेंनी व्यक्त केल्या मनातल्या त्या भावना, म्हणाल्या 'सव्वा वर्ष..'
- Published by:Kiran Pharate
Last Updated:
अजित पवार यांच्यासोबतच्या संवादाबाबत बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, की सव्वा वर्षापासून आमच्यात काहीही संवाद झालेला नाही. आमचं काहीही बोलणं झालं नाही
पुणे : खासदार सुप्रिया सुळे यांनी न्यूज 18 लोकमतला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं. यावेळी त्या अजित पवार यांच्याबद्दलही बोलल्या. सुप्रिया सुळे म्हणाल्या, की 'ओरबाडून घेण्यात काहीही मजा नसते. त्यांनी मागितलं असतं तर आम्ही दिलं असतं.' दरम्यान आता रक्षाबंधन जवळ येत आहे, अशात या फुटीनंतर सुप्रिया सुळे यंदा अजित पवारांना राखी बांधणार का? असा सवालही अनेकांच्या मनाच उपस्थित झाला आहे.
अजित पवार यांच्यासोबतच्या संवादाबाबत बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, की सव्वा वर्षापासून आमच्यात काहीही संवाद झालेला नाही. आमचं काहीही बोलणं झालं नाही, असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. लाडकी बहीण योजनेबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, की 1500 रुपयांनी नाती जोडता येत नाही. व्यवहार आणि नात्यातला फरक त्यांना कळला नाही, असं म्हणत त्यांनी सत्ताधाऱ्यांना टोला लगावला.
advertisement
लाडकी बहीण-भाऊ योजनेचं क्रेडिट जनतेला जातं. त्यांनीच लोकसभेला आम्हाला जास्त जागा दिल्याने सरकारने हा निर्णय घेतला. मात्र, आम्हाला मतदान झालं नाही तर त्या यादीतील नावं काढून टाकू, अशी धमकी जनतेला दिली जात आहे. भाऊ-बहिणीच्या नात्याचा जो अपमान झालाय, त्याचं मला दुःख वाटतं. त्यांच्यातीलच काही लोक म्हणतात, की एक बहीण गेली तर काय झालं? आम्ही दुसऱ्या जोडतो. मात्र, ही प्रेमाची, विश्वाची नाती असतात. ती 1500 रुपयांनी जोडता येत नाहीत. हे सरकार नातं आणि व्यवहार यात गल्लत करतंय. सगळं पैशाने विकत घेता येत नाही, असं त्या म्हणाल्या. लिंकवर क्लिक करून पाहा व्हिडीओ
advertisement
हे स्वअनुभवावरून बोलताय का? असं विचारलं असता सुप्रिया सुळे म्हणाल्या, की अनुभवाचं नाही. मला कोणी एखादी गोष्ट मागितली तर द्यायला फार हरकत नसते. मला जर मागितलं असतं तर राजीखुशी दिलं असतं, असं त्या म्हणाल्या. कुठल्याही भावाने मागितलं असतं तर प्रेमाने दिलं असतं. ओरबाडून घेण्यात काही मजा नसते. पक्षाची कमान त्यांच्या हातात होती . अध्यक्षपदाबाबतही निर्णय होणार होता. मात्र, त्यांनी आधीच निर्णय घेतला, असंही त्या अजित पवारांबाबत बोलताना म्हणाल्या
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 16, 2024 10:44 AM IST
मराठी बातम्या/Politics/
Supriya Sule: अजितदादांना राखी बांधणार का? सुप्रिया सुळेंनी व्यक्त केल्या मनातल्या त्या भावना, म्हणाल्या 'सव्वा वर्ष..'


