अंधेरी पूर्वेतील मरोळ मेट्रो स्टेशनजवळ असलेले सोनल सावंत यांचे ‘सोल रॅप्स’ स्टुडिओ सध्या महिलांची पहिली पसंती ठरत आहे. येथे अवघ्या 500 रुपयांपासून ते 7 हजार रुपयांपर्यंत विविध प्रकारच्या साड्या उपलब्ध आहेत. या स्टुडिओमध्ये 500 ते 700 रुपयांत साध्या पण आकर्षक काळ्या कॉटन साड्या, रोजच्या वापरासाठी तसेच संक्रांतीसाठी मिळतात. ब्लॅक अँड गोल्ड बॉर्डर असलेली कॉटन साडी ही 1200 रुपयांपासून उपलब्ध आहे.
advertisement
साधेपणा आणि एलिगंट लूक आवडणाऱ्या महिलांसाठी ही साडी विशेष ठरत आहे. थोडा ग्लॅमरस लूक हवा असेल तर सिक्वेन्स वर्क केलेली पूर्ण साडी येथे मिळते, ज्यावर संपूर्ण साडीला बांधलेले काम केलेले असून तिची किंमत 1500 रुपयांपर्यंत आहे. तसेच आर्मी कॉटन चेक्स साउथ साडी सुद्धा साडे पंधराशे रुपयांत उपलब्ध आहे. पारंपरिक साड्यांची आवड असणाऱ्यांसाठी वेस्ट बंगालची जामदानी साडी येथे मिळते. जामदानी साड्यांमध्ये अनेक रंग असले तरी ब्लॅक स्पेशल जामदानी महिलांची विशेष पसंती ठरत आहे. या साड्यांची किंमत देखील 1500 रुपयांपासून सुरू होते.
याशिवाय, माहेश्वरी कॉटन साड्या येथे रुपयांपर्यंत उपलब्ध असून, हाताने केलेल्या डिझाइन्समुळे त्या अधिक खास वाटतात. हॅण्डवर्क साड्या या 2200 रुपयांपासून सुरू होतात आणि डिझाइननुसार त्यांची किंमत वाढते. या सगळ्या साड्यांची खासियत म्हणजे या पूर्णपणे त्यांच्या स्वतःच्या मॅन्युफॅक्चरिंगमधून तयार केल्या जातात. भारतीय कलाकारांकडून आर्टवर्क करून घेतले जाते. साड्यांवरील कलर कॉम्बिनेशन, बुट्टे आणि डिझाइन्स हे सगळे अगदी वेगळे आणि आकर्षक असतात. ग्राहकांच्या मागणीनुसार कस्टमाइज साड्याही येथे उपलब्ध करून दिल्या जातात.