संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील तीन मूर्ती जैन मंदिर येथे नव्या कबूतरखान्याचे उद्घाटन केलं. यावेळी ते बोलत होते. तर लोढांच्या या वक्तव्यावरून विरोधकांनी मात्र त्यांच्यावर पुन्हा एकदा टीका केली. तर लोढांचे वक्तव्य न हे कोर्टाचा अवमान करणारं असल्याची टीका काँग्रेस नेत्यांनी केली आहे. मात्र एकंदर मुंबईतील 52 कबुतरखाने बंद करायला निघालेल्या मुंबई महापालिकेला आता 227 कबुतरखाने सुरू करावे लागणार म्हणजे रोगापेक्षा इलाज भयंकर अशी अनेकांची भावना झाली आहे.
advertisement
मंगल प्रभात लोढा काय म्हणाले?
दिगंबर जैन समाजातर्फे ही जागा आहे त्यामध्ये आज आपण कबूतर खाण्याचे उद्घाटन केलेला आहे . हा नॅशनल पार्कचा भाग आहे, नॅशनल पार्कमध्ये सर्व प्राणी, पक्षी पण वावर करतात. माझी अपेक्षा आहे प्रत्येक वॉर्डमध्ये अधिकृत कबूतर खाने उभे करू ... मुंबईमध्ये हा प्रॉब्लेम होता म्हणून आपण इथे सुरुवात केल्याचं त्यांनी सांगितलं, असे मंगल प्रभात लोढा म्हणाले.
कबुतरखान्यावरून जोरदार वादंग
दादर कबुतरखान्यावरून जोरदार वादंग सुरू आहे. धर्म आणि भूतदयेच्या नावाने राजकारण केलं जातं असल्याचा आरोप आहे. मात्र या कबुतरांमुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत. कबुतरांच्या नावाखाली सुरू असलेली भूतदया अनेकांच्या जीवावर उठली आहे. स्वत: च्या घरांना जाळ्या लाऊन बाहेर कबूतरांना खायला टाकणाऱ्यांनी कबुतरं घरात पाळावीत असा टोकाचा सल्ला दिला जातोय तर दुसरीकडे कबुतरांसाठी शस्त्र हातात घेऊन येऊ म्हणून धर्माचा आधार घेतला जातोय .. हे दोन्ही योग्य नाही. मूळ निसर्गसाखळीवर अतिक्रमण करण्याचा हा प्रकार न्यायालयाच्या मध्यस्थीनंतरही थांबत नसेल तर राज्य खरंच कायद्याच आहे का असा प्रश्न उपस्थित होतो.
